भारतीय संघाच फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची गुणवत्ता सर्व जगाला माहिती आहे. सध्या तो पहिल्यासारख्या फॉर्ममध्ये नाहीय, पण त्याला अपेक्षित संधीही दिली जात नाहीय. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून (IND VS SL) त्याला संधी न देताच बाहेर केले गेले. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कुलदीपला बाहेर करण्यामागचे कारण सांगितले आहे. बुमराहने सांगितलेलेल कारण खरोखर हास्यास्पद आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यादरम्यान, कुलदीप यादव भारतीय संघाचा भाग होता, पण प्लेइंग इेलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती. मोहाली कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव या तिघांना खेळवले गेले होते. तर बेंगलोर कसोटी सामना सुरू होण्यापूर्वीच कुलदीपला संघातून बाहेर केले गेले. कुलदीपच्या जागी अक्षर पटेलने संघात पुनरागमन केले आहे.
कुलदीपच्या भल्यासाठी त्याला संघातून बाहेर केले गेले !
कुलदीप यावदव (Kuldeep Yadav) याल संघातून बाहेर करण्यामागचे कारण बुमराहने सांगितले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) म्हणाला की, “कुलदीप यादव खूम मोठ्या काळापासून बायो बबलमध्ये होता. त्यामुळेच त्याला आयपीएलच्या आधी त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी दिली गेली आहे. बबलमध्ये वेळ घालवणे सोपे नाहीय. हा निर्णय त्याच्या भल्यासाठी घेतला गेला आहे.”
दरम्यान, कुलदीप यादवला श्रीलंकेविरुद्ध सध्या खेळली जाणारी मालिका आणि काही दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात निवडले गेल होते. तिन्ही प्रकारांच्या संघांमध्ये त्याची निवड केली गेली होती, पण फक्त दोन सामने खेळण्याची संधी त्याला मिळाली. वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्ध त्याला प्रत्येक १-१ टी-२० सामना खेळण्याची संधी दिली गेली. त्याव्यतिरिक्त तो इतर सामन्यांमध्ये फक्त सहकाऱ्यांना पाणी पाजतानाच दिसला.
मागच्या बऱ्याच दिवसांपासून कुलदीप दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. आता तो फिट झाला असला, तरी त्याल संधी मात्र मिळताना दिसत नाहीय. अशात जेव्हा स्वतःचा अत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी त्याला संधीची आवश्यकता आहे, तेव्हा त्याला संघातून बाहेर केले जात आहे. तसेच जसप्रीत बुमराहच्या मते यामध्येच कुलदीपची भलाई आहे. बुमराहच्या या उत्तरामुळे चाहते नाराज दिसत आहेत, तर काही त्याला ट्रॉल करत आहेत.
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने विरोधी गोलंदाजाला मारली बॅट, कॅमेरात कैद झाली होती पूर्ण घटना
दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का! वॉर्नर सुरुवातीच्या पाच सामन्यांतून बाहेर
“फिटनेसच्या जोरावर विराट सचिनचे सर्व विक्रम मोडेल” दिग्गजाने व्यक्त केला विश्वास