-अनिल भोईर
आशियाई स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने विजयीची हट्रिक साधत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
आशियाई स्पर्धेच्या ‘अ’ गटात आज भारतीय महिला खेळाडूंपुढे श्रीलंकाचा संघ संघर्ष करताना दिसला.
भारतीय महिला कबड्डी संघाने आज श्रीलंका विरुद्ध जोरदार खेळ करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत मध्यंतरापर्यत २३-०४ अशी भक्कम आघाडी घेतली होती. सोनाली शिंगटे व पायल चौधरी यांनी चांगला खेळ दाखवला.
मध्यंतरानंतर भारताने पुन्हा एकदा जोरदार खेळ करत आघाडी वाढवली. आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेली मराठमोठया सायली करिपाळेने कमालीचा खेळ केला.
श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात ४ गुणांची सुपररेड करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पहिली सुपररेड नोंदवली. हा तिचा आंतरराष्ट्रीय पदार्पणाचा सामना होता.
आशियाई स्पर्धेत मराठमोळ्या सायली करिपालेची ४ गुणांची सुपररेड…✌️#AsianGames2018 #IndiaKabaddi #KhelKabaddi @SherryPaaji @anilbhoir96 @ranga_ssd @AdityaGund @Maha_Sports pic.twitter.com/Xd5BsTIp2i
— Anil Bhoir Kabaddi (@AnilBhoir24) August 21, 2018
भारताने हा सामना ३८-१२ असा सहज जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा शेवटचा साखळी सामना यजमान इंडोनेशिया विरुद्ध आजच सकाळी १०:३० वाजता होणार आहे.
#AsianGames2018
महिला कबड्डी:
सायली केरीपाळे ची चमकदार कामगिरी,भारताने केला श्री लंकेचा पराभव!
🇮🇳३८-१२🇱🇰@Maha_Sports @AdityaGund @nachi_1793 @anilbhoir96 @SherryPaaji— Sharang Dhomse (@ranga_ssd) August 21, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहलीने माजी कर्णधार अझरचा २७ वर्ष जुना विक्रम मोडला
–या कारणामुळे रहाणे तिसऱ्या कसोटीत चमकला
–मुंबईकडून ९९ प्रथम श्रेणी सामने खेळणारा नायर आता पाँडिचेरीकडून खेळणार रणजी सामने