श्रीलंका विरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यासठी भारतीय संघ मंगळवारी (23 जुलै) श्रीलंकेला पोहचला आहे. टीम इंडियाच्या हेड कोच पदी निवड झालेल्या गाैतम गंभीरची ही मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलीच मालिका आहे. ज्यासाठी भारतीय संघ तयार आहे. टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 टी20 आणि तेवढ्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. वास्तविक, भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी श्रीलंका संघाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.
भारतीय संघाविरुद्ध 3 टी20 मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने काल (23 जुलै) संघाची घोषणा केली. ज्यामध्ये दुशमंता चमिराची निवड करण्यात आली होती. मात्र हा स्टार गोलंदाज सध्या मालिकेतून बाहेर पडला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, चमिरा दुखापतीमुळे या मलिकेतून बाहेर पडला आहे. असे बोलले जात आहे. पण अद्याप श्रीलंका बोर्डाकडून आधिकृत माहिती समोर आलेले नाही.
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ – चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दसून शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेल्लालागे, महिश तिक्ष्णा, चामिंडू विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, नुवान तुषारा, दुष्मंथा चमीरा आणि बिनुरा फर्नांडो
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी20 – 27 जुलै (पल्लेकेले)
दुसरा टी20 – 28 जुलै (पल्लेकेले)
तिसरा टी20 – 30 जुलै (पल्लेकेले)
पहिला एकदिवसीय – 2 ऑगस्ट (कोलंबो)
दुसरा एकदिवसीय – 4 ऑगस्ट (कोलंबो)
तिसरा एकदिवसीय – 7 ऑगस्ट (कोलंबो)
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवचे टी20 कर्णधार म्हणून निवड करण्यात आले आहे. वनडे आणि टी20 दोन्ही मध्ये शुबमन गिलला उपर्कणधार करण्यात आले आहे. तर एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे पुनरागमन होणार आहे.
हेही वाचा-
माजी क्रिकेटरने रोहित-कोहलीला दिला खास सल्ला; श्रीलंका मालिकेपूर्वी गौतम गंभीरबद्दलही स्पष्टचं बोलला
वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी, विश्नविजेता कर्णधार बनणार का इंग्लंडचा नवा मुख्य प्रशिक्षक?
कोहलीच्या कारकिर्दीत फक्त ‘एकच’ गोष्ट शिल्लक…, माजी भारतीय कर्णधाराबद्दल युनूस खानचे मोठे विधान