---Advertisement---

उद्या होणाऱ्या भारत-श्रीलंका सामन्यासाठी असणार ‘या’ गोष्टींवर बंदी

On: शनिवार, जानेवारी 4, 2020 7:41 PM
---Advertisement---

रविवारी (5 जानेवारी) गुवाहाटी (Guwahati) येथे भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (3 Matches T20 Series) पहिल्या सामना पार पडणार आहे.

त्याचबरोबर भारतामध्ये सध्या नागरिकत्व कायद्यामुळे (CAA) तणावाचे वातावरण आहे.  त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता उद्याच्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये बॅनर किंवा पोस्टर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती आसाम क्रिकेट असोसिएशनचे (Assam Cricket Association) सचिव देवाजीज सैकिया यांनी दिली.

या निर्णयाचा नागरिकत्व कायद्याच्या विरोधाशी कोणताही संबंध नाही. हा निर्णय फक्त सुरक्षेचा विचार करून घेण्यात आला आहे,  असे गुवाहाटी पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले.

या स्टेडियमवरील खेळाडू, प्रेक्षक आणि इतर व्यक्तींची सुरक्षा लक्षात घेऊन काही नियम करण्यात आले आहेत.

आसाम क्रिकेट असोसिएशनच्या(एसीए) माहितीनुसार, सामन्यादरम्यान चौकार आणि षटकारच्या प्लेकार्डऐवजी पेपरवर वापरण्यात येणाऱ्या मार्करवरही बंदी घालण्यात आली आहे.

पुरुषांना पाकिट, महिलांना त्यांची पर्स, मोबाईल फोन आणि वाहनांची चावी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यावेळी एसीएचे सचिव सैकिया म्हणाले होते की, “हा नियम सर्वांसाठी असेल. तसेच हा एक आंतरराष्ट्रीय सामना असल्यामुळे या सामन्यात उच्चस्तराची सुरक्षा देण्यात येणार आहे.”

सामन्यामध्ये प्रेक्षकांना चौकार- षटकारांचे प्लेकार्ड स्पाॅन्सर्सकडून उपलब्ध करण्यात येत असतात. त्यामुळे याबाबतीत आम्ही काही करू शकत नाही. तसेच, आम्ही स्थानिक प्रशासनाशी चर्चा करू, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीसीसीआयचे प्रतिनिधी एम मुजूमदार यांनी सांगितले की, आतापर्यंत 27000 तिकीटे विकली गेली आहेत. बारसपारा या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 39400 इतकी आहे. त्यामुळे सामन्यात प्रेक्षकांची गर्दी असेल.

https://twitter.com/Maha_Sports/status/1213446808422117377

https://twitter.com/Maha_Sports/status/1213436864423612417

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---