आजपासून(3 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज फ्लोरीडा येथे होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.
2019 वनडे विश्वचषकानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आज मैदानात उतरणार आहेत. तसेच पुढीलवर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी ही 20 मालिका महत्त्वाची आहे.
भारतीय संघात या टी20 मालिकेसाठी श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दिपक चाहर, राहुल चाहर, नवदीप सैनी, कृणाल पंड्या, मनिष पांडे अशा युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यातील आता किती खेळाडूंना आज 11 जणांच्या संघात संधी मिळणार हे पहावे लागणार आहे.
तसेच शिखर धवन 2019 विश्वचषकात झालेल्या दुखापतीनंतर विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
विंडीज संघाचे कर्णधारपद या मालिकेत कार्लोस ब्रेथवेट सांभाळणार आहे. तसेच त्यांच्या संघाकडून आज सुनील नारायण आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पुनरागमन करण्याचे अपेक्षित आहे.
तसेच वेस्ट इंडीजच्या संघात किरॉन पोलार्ड, शिमरॉन हेटमायर, एव्हिन लुईस अशा फलंदाजांचा समावेश आहे. तसेच गोलंदाजांमध्ये शेल्डन कॉट्रेल, ओशान थॉमस या गोलंदाजांचाही समावेश आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात आत्तापर्यंत 11 टी20 सामने झाले आहेत. त्यातील 5 सामन्यात भारताने तर 5 सामन्यात वेस्ट इंडीजने विजय मिळवला आहे. तसेच 1 सामना अनिर्णित राहिला आहे.
आज होणाऱ्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याबद्दल सर्वकाही…
कधी होणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना आज(1 ऑगस्ट) होणार आहे.
किती वाजता सुरु होणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होईल.
कुठे होणार आहे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना सेंट्रल ब्रोवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना सोनी नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला टी20 सामना सोनीलीव (SonyLIV) या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडले जातील 11 जणांचे संघ-
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर , नवदीप सैनी.
वेस्ट इंडीज – कार्लोस ब्रॅथवेट (कर्णधार), अँथनी ब्रॅम्बल, जॉन कॅम्पबेल, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमेयर, एव्हिन लुईस, सुनील नारायण, किमो पॉल, खॅरी पिएर, किरॉन पोलार्ड, निकोलस पूरन, रोव्हमन पॉवेल, जेसन मोहम्मद आणि ओशान थॉमस.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–भारताविरुद्ध पहिला टी२० सामना खेळण्याआधी विंडीजला मोठा धक्का!
–धोनीला ७व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा माझा एकट्याचा निर्णय नव्हता – संजय बांगर
–कसोटीमध्ये क्रमांक, नाव असलेली जर्सी घालण्यावर भडकला हा माजी यष्टीरक्षक





