---Advertisement---

आधी गळाभेट, चुंबन आणि नंतर अश्रू! विराटला भेटताच विंडीजच्या खेळाडूची आई लागली रडू, भावूक करणारा Video

On: शनिवार, जुलै 22, 2023 1:29 PM
Virat-Kohli-And-Joshua-Da-Silva-Mother
---Advertisement---

वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला जात आहे. या मालिकेत भारतीय संघ 1-0ने आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, भारताने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 438 धावांचा पाऊस पाडला आहे. यादरम्यान भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने शतकी खेळी साकारली. विराटने यावेळी त्याच्या कारकीर्दीतील 76वे आंतरराष्ट्रीय शतक केले. विराटसाठी हा खूपच खास क्षण ठरला. कारण, त्याने 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकी खेळी साकारली. तो अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडूही बनला. अशात विराटने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

विराटच्या गळ्यात पडून रडली ‘या’ खेळाडूची आई
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने त्याच्या 500व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात 121 धावा चोपून शतकी खेळी साकारली. यादरम्यान वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक फलंदाज जोशुआ डा सिल्वा (Joshua Da Silva) याने विराटला म्हटले होते की, त्याची इच्छा आहे की, त्याने शतक करावे. त्याने असेही म्हटले होते की, त्याची आई फक्त विराटला पाहण्यासाठई स्टेडिअममध्ये येत आहे. आता जोशुआच्या आईचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटला भेटून वेस्ट इंडिजचा खेळाडू जोशुआ डा सिल्वाची खेळाडूची आई रडू (Joshua Da Silva Mother Cried) लागली. विशेष म्हणजे, सामन्यानंतर जोशुआच्या आईने विराटची भेट घेतली. यावेळी विराटला भेटताच त्या खूपच भावूक झाल्या. विरोधी संघाचा खेळाडू असो किंवा त्याचे कुटुंब, प्रत्येकजण विराटचा चाहता आहे. हीच गोष्ट विराटला महान खेळाडू बनवते.

विराटला भेटल्यानंतर काय म्हणाली जोशुआची आई
विराटला भेटण्यासाठी स्टेडिअममध्ये आलेली जोशुआ डा सिल्वाच्या आईने त्याची गळाभेट घेतली. त्यानंतर त्यांनी विराटचे चुंबनही घेतले. त्यांनी विराटच्या शानदार फलंदाजीसाठी त्याचे अभिनंदनही केले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रूही तरळले. विराटशी भेटल्यानंतर जोशुआच्या आईने म्हटले की, त्या आणि त्यांचा मुलगा जोशुआ विराटचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांच्यासाठी हा खूपच खास क्षण राहिला. जोशुआच्या आईने असेही म्हटले की, ही खूप मोठी गोष्ट आहे की, विराट त्यांच्या देशात येऊन क्रिकेट खेळत आहे.

याव्यतिरिक्त विराट कोहलीविषयी बीसीसीआयनेही आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक करताना दिसत आहेत. (india vs west indies 2nd test joshua da silva mother got emotional after meeting virat kohli see video)

महत्त्वाच्या बातम्या-
Video – चपळता दाखवणे विराटच्या अंगलट, 121 धाावांवर खेळत असताना अल्झारीच्या सुपर थ्रोने केला घात
पदार्पण होताच मुकेशने आईला केला पहिला फोन, भावूक व्हिडिओ जिंकतोय सर्वांची मने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---