---Advertisement---

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात होणार मोठा बदल! ‘या’ स्टार खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी

On: रविवार, जुलै 24, 2022 2:12 PM
wi v ind odi
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना शुकिरवीर दिनांक २२ जुलै रोजी खएळवला गेला. या सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज संघात अतितटीची लढाई पाहायला मिळाली. या वेळी भारतीय संघाने केवळ ३ धावांनी वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत विजय मिळवला आणि ३ सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. यासामन्यात भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्याचप्रमाणे भारतीय गोलंदाजांनीही आपली प्रतिभा दाखवत वेस्ट इंडिजला लक्ष्य गाठू दिले नाही. यावेळी भारतीय संघासाठी सर्वोत्कृष्ट मोहम्मद सिराजने १० षटकात ५७ धावा देत २ बळी घेतले. शिवाय शार्दूल ठाकूरने ८ षटकांत ५४ धावा देत २ बळी घेतले. मात्र, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजी क्रमात बदल पाहायला मिळू शकतो.

वनडे मालिका सुरू होण्यापूर्वीच अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. या दुखापतीमुळे जडेजा दुसऱ्या वनडेतूनही बाहेर असणार आहे. जडेजाच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, परंतु तो चेंडूवर प्रभाव पाडू शकला नाही आणि तो खूप महागडा ठरला. एवढेच नाही तर अक्षर पटेलला हाताच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले, त्यामुळे तो खेळण्यासाठी फिट आहे की नाही हे पाहावे लागेल.

अर्शदिप सिंग करणार पदार्पण?
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला विजय मिळाला असला तरीही शार्दूल ठाकूर अन् प्रसिद्ध कृष्णा यांनी अपेक्षेपेक्षा जास्त धावा दिल्या. विशेषत: शेवटच्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी जास्त धावा दिल्या. त्यामुळे भारताला सध्या शेवटच्या षटकांत चांगली गोलंदाजी करू शकेल अशा गोलंदाजाची गरज आहे. त्यामुळे अर्शदिप सिंग याला दुसऱ्या एकदिवसूय सामन्यात एकदिवसीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

WIvsIND: टीम इंडिया जिंकल्यास पाकिस्तानचा करणार खेळखंडोबा! वाचा काय आहे समीकरण

धवन दुसऱ्या वनडेत पूर्ण करणार अधुऱ्या शतकाची कसर? धोनी, गांगुलीच्या यादीत होणार सामील

अगंबाई..! रणवीर सिंगनंतर आता भारतीय क्रिकेटरही झाला नग्न, पत्नीकडून करून घेतले फोटोशूट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---