---Advertisement---

टीम इंडियाच्या मुंबईत होणाऱ्या या सामन्यात मोठा फेरबदल, आता या शहरात होणार सामना

On: रविवार, नोव्हेंबर 24, 2019 1:16 PM
---Advertisement---

बीसीसीआयने भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघाच्या (India vs West Indies) टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यांच्या ठिकाणांची आदलाबदली केली आहे.

त्यामुळे आता 6 डिसेंबरला मुंबईत(Mumbai) आयोजित केलेला पहिला टी20 सामना हैद्राबादला(Hyderabad) हलवण्यात आला आहे. तर 11 डिसेंबरला हैद्राबादला आयोजित केलेला सामना मुंबईला हलवण्यात आला आहे.

6 डिसेंबरला बाबरी मशीद विध्वंसचा वर्धापन दिन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “महापरिनिर्वाण दिन” असल्याने मुंबईत त्यादिवशी सतर्कतेचा इशारा आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी 6 डिसेंबरला मुंबईतील सामन्याला सुरक्षितता देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

त्याचमुळे 6 डिसेंबरला मुंबईतील सामना हैद्राबादला हलवण्यात आला आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ‘बीसीसीआयने मुंबई (6 डिसेंबर) आणि हैदराबाद (11 डिसेंबर) येथे आयोजित केलेले सामन्यांमध्ये आदलाबदली करण्यास सहमती दर्शविली आहे. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (एचसीए) अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन यांची संमती मिळाल्यानंतर आम्ही हे केले आहे.’

आणखी एका सूत्रांनी सांगितले की, एचसीएचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार अझरुद्दीन यांनी सामन्यांच्या ठिकाणात अदलाबदल करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, अन्यथा सामना मुंबईने गमावला असता.

असे होणार आहेत भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात सामने –

टी20 मालिका  –

6 डिसेंबर – पहिला टी20 सामना – हैद्राबाद

8 डिसेंबर – दुसरा टी20 सामना – तिरुअनंतपुरम

11 डिसेंबर – तिसरा टी20 सामना – मुंबई

वनडे मालिका –

15 डिसेंबर – पहिला वनडे – चेन्नई

18 डिसेंबर – दुसरा वनडे – विशाखापट्टणम

22 डिसेंबर – तिसरा वनडे – कटक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---