भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या (WIvsIND) दौऱ्यावर आहे. यामध्ये वनडे मालिका जिंकल्यानंतर भारताने टी२० मालिकेसही उत्तम सुरूवात केली आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर आहे. या दौऱ्यात भारताच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र एक असा फलंदाज आहे जो सतत धावा काढण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे त्याचे अंतिम अकरातील स्थान धोक्यात आले आहे.
रोहित करू शकतो या खेळाडूला बाहेर
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) श्रेयस अय्यर याला अंतिम अकरातून बाहेर करू शकतो. श्रेयसने वनडे मालिकेत चांगले प्रदर्शन केले होते, मात्र टी२० मालिकेत आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून धावाच निघाल्या नाही. तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव हा यजमान संघाला सळो की पळो करून सोडत होता, तर श्रेयस पुन्हा एकदा वाईट खेळी करून बाद झाला. टी२०च्या प्रकारामध्ये तो मागील काही सामन्यांपासून निराशाजनक कामगिरी करत आहे. त्याने या दौऱ्यातील तीन टी२० सामन्यात ०, १० आणि २४ अशा धावा केल्या आहेत (Shreyas Iyer T20 Form).
जडेजाचे संघपुनरागमन
तिसऱ्या टी२० सामन्यात रविंद्र जडेजा याला विश्रांती दिली होती. त्याच्याजागी दीपक हुड्डा संघात आला होता. यामुळे चौथ्या सामन्यात जडेजा संघात परतणार, तर हुड्डा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसण्याची शक्यता आहे. हुड्डाने याआधीही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. जर असे झाले तर, श्रेयसला बाकावर बसण्याची वेळ येणार. हुड्डाला दोन सामन्यांसाठी संघाबाहेर ठेवले होते. तो चागंल्या फॉर्ममध्ये आहे, मात्र भारताच्या मधल्या फळीत श्रेयस बरोबर सूर्यकुमारला संधी मिळाली.
दीपक हुड्डाची टी२०तील कामगिरी
हुड्डाने भारतासाठी ७ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ७१.६७च्या सरासरीने २१५ धावा केल्या. तसेच त्याने एक शतकही ठोकले आहे. त्याने जून महिन्यात आयर्लंडच्या दौऱ्यात १०४ धावांची खेळी केली. भारतीय क्रिकेट बोर्ड आगामी टी२० विश्वचषकासाठी संघबाधणीही तयारी करत आहे. अशातच हुड्डाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. त्याने मोठी खेळीही केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WIvsIND: टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज! शेवटच्या सामन्यांवर निघाला तोडगा
कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्क्वॉश एकेरीत भारताचे पहिले पदक! सौरव घोषालची ऐतिहासिक कामगिरी
रोहितनंतर सलामीवीर म्हणून टी२०त स्म्रीतीचाच बोलबाला, बनलीये पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर