---Advertisement---

अशी कामगिरी करणारा किंग कोहली ठरला पहिलाच भारतीय

On: गुरूवार, डिसेंबर 12, 2019 7:43 PM
---Advertisement---

बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai) येथे 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (3 Matches T20 Series) अंतिम आणि निर्णायक सामना भारत विरुद्ध विंडीज (India vs Windies) संघात पार पडला.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) उत्कृष्ट कामगिरी करत एक नवा विक्रम केला आहे. भारताकडून प्रथम फलंदाजी करताना 12 व्या षटकात रोहित शर्मा (Rohit Sharma) बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी उतरला.

विराटने या सामन्यात 29 चेंडूत नाबाद 70 धावा केल्या. याबरोबरच त्याने भारतात खेळताना आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पार केला.

मायदेशात 1000 टी20 धावा पूर्ण करणारा तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तर एकूण तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी न्यूझीलंडचे फलंदाज मार्टिन गप्टिल (Martin Guptill) आणि काॅलिन मुनरो (Colin Munro) अशी कामगिरी केली आहे.

विराटला भारतात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 6 धावांची आवश्यकता होती. हेडन वॉल्शच्या (Hayden Walsh) चेंडूवर त्याने 14व्या षटकात षटकार ठोकत या 1000 धावा पूर्ण केल्या.

विराटच्या आता भारतात खेळताना 29 टी20 सामन्यात 53.20 च्या सरासरीने 1064 धावा झाल्या आहेत

बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने विंडीजला 67 धावांनी पराभूत केले आणि मालिका 2-1ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये मायदेशात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

1430 – मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड)

1064 – विराट कोहली (भारत)

1000 – कॉलिन मुनरो (न्यूझीलंड)

928 – रोहित शर्मा (भारत)

857 – डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---