कसोटी आणि वनडे मालिकेत विजय मिळविल्यानंतर टीम इंडिया टी२० मालिकेत विंडीज विरुद्ध विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतीय संघाचे या मालिकेत नेतृत्व प्रभारी कर्णधार रोहित शर्मा करणार आहे.
उद्यापासून ही मालिका सुरु होत असुन पहिला सामना कोलकाताला होत आहे. या मालिकेत अनेक खास विक्रम होणार आहे. त्यातील काही विक्रम असे-
१. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा १०वा खेळाडू होण्यासाठी रोहितला केवळ १०१ धावांची गरज. रोहितने ३०२ सामन्यात ४२.८७च्या सरासरीने ११०१९ धावा केल्या आहेत. सध्या या स्थानावर व्हीव्हीएस लक्ष्मण असुन त्याने २२० सामन्यात ४१.६४च्या सरासरीने ११११९ धावा केल्या आहेत.
२. टी२०मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्यासाठी रोहितला केवळ १७ धावांची गरज. रोहितने ८४ टी२० सामन्यात ३२.५९च्या सरासरीने २०८६ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून अव्वल स्थानी विराट कोहली असुन त्याने ६२ सामन्यात ४८.८८ च्या सरासरीने २१०२ धावा केल्या आहेत.
३. टी२०मध्ये भारताकडून टी२०मध्ये १ हजार धावा करण्यासाठी शिखर धवनला २३ धावांची गरज. त्याने ४० सामन्यात २६.४० सरासरीने ९७७ धावा केल्या आहेत. त्याने जर या २३ धावा केल्या तर भारताकडून टी२०मध्ये १ हजार धावा करणारा तो विराट, रोहित, रैना, धोनी आणि युवराजपाठोपाठ ६वा खेळाडू ठरेल.
४. टी२०मध्ये ५० विकेट्स पुर्ण करण्यासाठी बुमराहला ७ विकेट्सची गरज. त्याने ३५ सामन्यात १९.९३च्या सरासरीने ४३ विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून केवळ आर अश्विनने टी२०त (५२) ५० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
५. बुमराहप्रमाणेच टी२०मध्ये ५० विकेट्स पुर्ण करण्यासाठी चहलला ८ विकेट्सची गरज. त्याने २७ सामन्यात २२.२९ च्या सरासरीने ४२ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडियासोबतचे ते प्रकरण सायमंड्सला चांगलेच भोवले…झाला व्यसनी
–रणजी ट्राॅफी सामन्यात मुंबईकर खेळाडूंनी केली मास्क घालून फलंदाजी