भारतीय पुरूष क्रिकेट संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर (ZIMvsIND) आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. हे तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे खेळले जाणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून शिखर धवनला नियुक्त केले होते, मात्र केएल राहुलचे संघात पुनरागमन झाल्याने त्याला संघाचे नेतृत्व सोपवले. या दौऱ्यात सामन्याआधी झालेल्या एका पत्रकार परिषदेत धवनने युवा खेळाडूंचे प्रश्न सोडवण्याची माझी तयारी आहे, असे विधान केले आहे. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजांना सावध राहण्यासही सांगितले आहे.
भारताचा डाव्या हाताचा स्फोटक फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत युवा खेळाडूंविषयी आपले मत मांडले आहे. त्याने म्हटले, “युवा खेळाडूंसोबत अनुभव शेयर करताना मजा येते. मी हरारेमध्ये २०१३ला आलो होतो. तेव्हा भारताचे मुख्य प्रशिक्षक डंकन प्लेचर होते. जर कोणातही युवा खेळाडू माझ्याकडे काही प्रश्ने घेऊन आली तर त्याची उत्तरे देण्यास मी नेहमीच तयार आहे.”
केएल राहुल (KL Rahul) याला एशिया कप (Asia Cup) आधी काही सामने खेळण्याची संधी मिळत आहे. यावरूनही धवन म्हणाला, “राहुल संघात परतला हे चांगले झाले. तो भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. एशिया कप सुरू होण्यापूर्वी त्याची चांगली तयारी होईल. त्याला या दौऱ्यातून फायदा होणार याचा मला विश्वास आहे.”
या दौऱ्यातून वाशिंगटन सुंदर दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. इंग्लंडच्या रॉयल लंडन वनडे कपमध्ये खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्याने भारताकडून शेवटचा सामना २०२१मध्ये खेळला होता. त्याच्याजागी शाहबाज अहमदची संघात वर्णी लागली आहे.
झिम्बाब्वेने नुकतेच घरच्या मैदानावर बांगलादेशचा मर्यादीत षटकांच्या मालिकेत २-१ असा पराभव केला आहे. अशा जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या संघाचे कौतुक करताना धवन म्हणाला, “ते एक चांगल्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहेत. त्यांची एकही गोष्ट वगळणे संघासाठी धोकादायक ठरेल. यासाठी त्यांना कमी लेखणे योग्य नाही.” सिंकदर रजा (Sikandar Raza) याच्या फलंदाजीचे गोडवेही धवनने गायले आहेत. तो म्हणाला, “सिंकदर हा झिम्बाब्वेचा अनुभवी खेळाडू आहे. मला विश्वास आहे की, त्याच्यासाठी आमच्या गोलंदाजांकडे काही योजना असतीलच.”
सिंकदरने बांगलादेश विरुद्धच्या तीन वनडे सामन्यांत २५२.००च्या सरासरीने २५२ धावा केल्या आहेत.
झिम्बाब्वेच्या दौऱ्यात शुबमन गिल, आवेश खान, इशान किशन या युवा खेळाडूंना विशेष कामगिरी करण्याची संधी आहे. त्यांना जो अनुभव मिळत आहे तो त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना १८ ऑगस्टला खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान विरुद्ध नाही, ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळा’; टीम इंडियाला ‘दादा’ने दिला प्रेमाचा सल्ला
देशातील बड्या नेत्याच्या मुलाचं क्रिकेट असोसिएशनमधील मोठं पद जाणार! सुप्रिम कोर्ट ठरतंय अडथळा
‘बाबरचे वादळ रोखणं होतंय कठीण!’ मागील ८ पैकी ७ सामन्यात झळकावलंय अर्धशतक, वाचा रेकॉर्ड्स






