अँटिग्वा। आजपासून (22 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाची वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेने भारत आणि वेस्ट इंडीज संघ कसोटी चॅम्पियनशीपमधील त्यांच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.
या मालिकेतील पहिला सामना आजपासून सर विवियन रिचर्डसन स्टेडीयमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून कसोटी चॅम्पियनशिपला विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.
त्याचबरोबर भारतीय संघासाठी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान भक्कम करण्याच्या दृष्टीनेही ही कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
या मालिकेसाठी भारताचे कसोटी स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन हे खेळाडू भारतीय संघात सामील झाले आहेत. हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळजवळ 7 महिन्यांनंतर खेळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या खेळाकडे लक्ष असेल.
तसेच मयंक अगरवाल आणि केएल राहुल हे सलामीला फलंदाजीला उतरतील. पण यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत की वृद्धीमान सहा हा प्रश्न कर्णधार विराट कोहली समोर असेल. तसेच रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यातील कोणाला मधल्या फळीत खेळवायचे हा देखील मोठा पेच विराट समोर असेल.
विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. त्याने नुकताच वेस्ट इंडीजचा या वर्षातील सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कार मिळवला आहे. तसेच तो कसोटी क्रमवारीत अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
याबरोबरच जॉन कॅम्पबेल, शाय होप, शिमरॉन हेडमेयर, डॅरेन ब्रावो हे फलंदाज वेस्ट इंडीजकडे आहेत. तर शॅनन ग्रॅब्रियल, केमार रोच हे गोलंदाज असून आज राहकिम कॉर्नवॉल कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे.
या कसोटी सामन्यात पावसाची शक्यता नाही. पण वातावरण काही प्रमाणात ढगाळ असेल. त्यामुळे दोन्ही संघ वेगवान गोलंदाजांना पसंती देण्याची शक्यता आहे.
भारत- विंडीज संघातील पहिल्या कसोटबद्दल सर्वकाही –
कधी होणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना 22 – 26 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
किती वाजता सुरु होणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल.
कुठे होणार आहे वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयम, अँटिग्वा येथे होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना सोनी नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
-वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना सोनीलीव (SonyLIV) या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.
यातून निवडले जातील 11 जणांचे संघ-
वेस्ट इंडीज – क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमर्ह ब्रूक्स, शिमरॉन हेटमेयर, शेन डोवरिच, शाय होप (यष्टीरक्षक), रहकीम कॉर्नवॉल, जेसन होल्डर (कर्णधार), रोस्टन चेस, मिगेल कमिन्स, जॉन कॅम्पबेल, केमार रोच, शॅनन गॅब्रिएल
भारत – रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, रिषभ पंत, वृध्दिमान साहा, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कर्नाटकला दोनदा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देणारा विनय कुमार आता खेळणार या संघाकडून
–स्मिथच्या दुखापतीनंतर बीसीसीआयने हेल्मेटच्या बाबतीत घेतला हा मोठा निर्णय
–विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मिळाला हा मोठा पुरस्कार