---Advertisement---

टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारत गमावणार? या देशात होऊ शकते आयोजन

On: शनिवार, मे 22, 2021 12:46 AM
---Advertisement---

आगामी ऑक्टोबर महिन्यात आयोजित होणाऱ्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारत भूषवणार होता. मात्र, भारताच्या हातून या सर्वात मोठ्या आयोजनाचे यजमानपद जाणे जवळपास नक्की झाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी२० विश्वचषक भारत सोडून इतरत्र आयोजित करण्याचा विचार पक्का केला असून, आयसीसीच्या पुढील बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाईल. भारतानंतर आता ही स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार? याबाबत आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

या ठिकाणी होऊ शकते स्पर्धा
सध्या भारतात कोरोना या आजाराचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. याच कारणाने आयपीएल २०२१ चा चौदावा हंगाम २९ सामन्यांनंतर स्थगित केला गेला. आता पुन्हा भारतात टी२० विश्‍वचषक आयोजित करणे धोक्याचे आहे.

दुबई येथे १ जून रोजी आयसीसीची बैठक होणार असून टी२० विश्वचषकाच्या आयोजन स्थळाविषयी या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होईल. तत्पूर्वी, २९ मे रोजी बीसीसीआय देखील एक बैठक घेणार आहे. भारताकडून स्पर्धेचे यजमानपद काढून घेतल्यास ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई येथे खेळवली जाऊ शकते. दक्षिण आशियाचा विचार केल्यास भारताव्यतिरिक्त श्रीलंका व बांगलादेश हे दोन पर्याय आहेत. परंतु, या दोन्ही देशांमध्ये देखील कोरोनाचे संकट आहे. मागील वर्षी आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईमध्ये निर्विघ्न पार पडलेला. त्या कारणाने तेथेच स्पर्धा आयोजित करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

पुढे ढकलली होती स्पर्धा
टी२० विश्वचषक अखेरच्या वेळी भारतात २०१६ साली खेळला गेलेला. त्यानंतर, २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषक एक वर्ष पुढे ढकलून भारतात खेळण्याचे नियोजन होते. मात्र, आता ही स्पर्धा अन्य ठिकाणी होण्याची शक्यता बळावली आहे. वेस्ट इंडीज सध्या विश्वचषकाचे गतविजेते आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंड दौऱ्यापूर्वी आपल्या ‘या’ कौशल्याला धार देतोय रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ

कमालच! ‘गब्बर’ शिखर धवनचा दिसला अनोखा अंदाज, बासरी वाजवतानाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

‘द्रविड भारताला सर्वोत्तम बनवू इच्छित होता, पण अनुभवी खेळाडूंनी साथ दिली नाही’ चॅपेल यांचा खळबळजनक दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---