भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात होणाऱ्या टी२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएल २०२२चा रणसंग्राम संपल्यानंतर भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली आहे. (India vs South Africa 5 Matches T20 Series Will Be Held In June)
या ठिकाणी खेळले जातील सामने
जून महिन्यात दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ या मालिकेसाठी भारतात (India) येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्ली येथे खेळला जाईल. हा सामना ९ जून रोजी होईल. दुसरा सामना १२ जून रोजी कटक येथे खेळला जाईल. तसेच, तिसरा सामना १४ जून रोजी वायझॅग येथे, चौथा सामना १७ जून रोजी राजकोट येथे आणि मालिकेतील शेवटचा टी२० सामना १९ जून रोजी बंगळुरू येथे खेळला जाईल.
NEWS 🚨 – BCCI announces venues for home series against South Africa.
More details 👇 #INDvSA #TeamIndia https://t.co/suonaC39wR
— BCCI (@BCCI) April 23, 2022
भारत- दक्षिण आफ्रिका आमने- सामने कामगिरी
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील आमने- सामने कामगिरी पाहिली, तर या दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताचेच पारडे जड आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत १५ टी२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी ९ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत, तर उर्वरित ६ सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यात यश आले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांचीही केली घोषणा
सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी प्लेऑफ सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, त्यांनी हेही सांगितले की, यादरम्यान दर्शकांच्या संख्येवर कोणतेही बंधन नसेल.
आयपीएल २०२२मधील पहिला प्लेऑफ सामना २४ मे आणि एलिमिनेटर सामना २६ मे रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा प्लेऑफ सामना २७ मे रोजी आणि अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळला जाईल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ ठिकाणी खेळला जाणार आयपीएल २०२२चा अंतिम सामना; दर्शकांना १०० टक्के क्षमतेने एन्ट्री
नो बॉल वादावर राजस्थानच्या प्रशिक्षकांनी सोडले मौन; म्हणाले, ‘पंच खेळाला नियंत्रित करतात’
आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी व्यर्थ, गुजरातचा शेवटच्या षटकात रोमांचक विजय