भारतीय संघाने (team india) वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला आणि मालिकाही नावावर केली. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजला ४४ धावांनी पराभूत केले आणि मालिकेत (ind vs wi odi series) २-० अशी विजयी आघाडी घेतली. या विजयानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धची सलग ११ वी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. एका संघाविरुद्ध लागोपाठ सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या विक्रमात भारताने आता पाकिस्तानची बरोबरी केली आहे.
पाकिस्तान संघाच्या नावावर आहे हा मोठा विक्रम
एका संघाविरुद्ध लागोपाठ सर्वात जास्त एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. पाकिस्तानने जिम्बाब्वेविरुद्ध मागच्या सलग ११ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. या मालिका १९९६ ते २०२१ यादरम्यानच्या काळात खेळल्या गेल्या आहेत. जिम्बाब्वेला यादरम्यान एकाही मालिकेत पाकिस्तानला मात देता आली नाही. भविष्यात पाकिस्तानला हा विक्रम नक्कीच अजून मोठा करता येऊ शकतो.
मागच्या १६ वर्षात वेस्ट इंडीजला एकदाही भारताला नाही देता आली मात
भारतीय संघानेही मागच्या सलग ११ एकदिवसीय मालिकांमध्ये वेस्ट इंडीज संघाला मात दिली आहे. या ११ मालिका २००७ ते २०२२ या दरम्यानच्या काळात खेळल्या गेल्या आहेत. वेस्ट इंडीजने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील अखेरचा विजय २००६ मध्ये मिळवला होता. वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या या मालिकेत भारताने १-४ असा पराभव पत्करला होता.
एका संघाविरुद्ध लागोपाठ सर्वात जास्त एकदिवसीय मालिका जिंकणारे पाच संघ
एका संघाविरुद्ध लागोपाठ सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या संघांमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर होता. भारताने आता त्यांची बरोबरी केली आहे. पाकिस्तानने जिम्बाब्वेविरुद्ध आणि भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध सलग ११ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा पाकिस्तान आहे. १९९९ ते २०१७ या दरम्यान पाकिस्तानने वेस्ट इंडीजविरुद्ध सलग ९ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत.
या यादीत चौथ्या क्रमांकावर दक्षिण अफ्रिका संघ आहे. दक्षिण अफ्रिकेने १९९५ ते २०१८ या दरम्यानच्या काळात जिम्बाम्बेविरुद्ध सलग ९ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. यादीत पाचव्या क्रमांकावर पुन्हा एकदा भारतीय संघ आहे. भारतीय संघाने २००७ ते २०२१ दरम्यान श्रीलंकेविरुद्ध सलग ९ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
धोनी किंवा कोहलीकडून ती गोष्ट पाहिजे होती, अखेर…; दीपक हुड्डाची लक्षवेधी प्रतिक्रिया
‘निर्णय माझे आणि क्रेडिट दुसऱ्यांनीच घेतले’; कायमचा संघाबाहेर होण्याच्या वाटेवर असलेला रहाणे संतापला
छोटेखानी खेळी करूनही कोहलीच्या नावे ‘विराट’ विक्रम, गांगुली- तेंडूलकरला पछाडत बनला ‘रनवीर’