१९ जानेवारी २०२१ या दिवशी भारतीय संघाने जागतिक क्रिकेटच्या इतिहासात नव्या अध्यायाची नोंद केली. ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतीय संघाने आपला सलग दुसरा कसोटी मालिका विजय नोंदवला. त्याचप्रमाणे सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर चषक भारताने आपल्याकडे राखण्याची किमया केली.
यासह बॉर्डर-गावसकर चषकात भारताने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. भारताने ही मालिका तब्बल नवव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला. १९९६ पासून पंधरा वेळा बॉर्डर-गावसकर चषक ही मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळवण्यात आली. यापैकी नऊ वेळा भारताने चषकावर आपले नाव कोरले असून ऑस्ट्रेलियाने पाच वेळा हा चषक जिंकला आहे. तर २००३ साली या चषकाअंतर्गत खेळवण्यात आलेली मालिका बरोबरीत सुटली होती.
बॉर्डर-गावसकर चषकाचे विजेते –
१९९६ – भारत
१९९८ – भारत
१९९९ – ऑस्ट्रेलिया
२००१ – भारत
२००३ – बरोबरी
२००४ – ऑस्ट्रेलिया
२००७ – ऑस्ट्रेलिया
२००८ – भारत
२०१० – भारत
२०११ – ऑस्ट्रेलिया
२०१३ – भारत
२०१४ – ऑस्ट्रेलिया
२०१७ – भारत
२०१८ – भारत
२०२० – भारत*
दरम्यान, भारतीय संघाने या मालिका विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दावेदारी देखील मजबूत केली आहे. तसेच आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेपही घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
अजिंक्य रहाणेने पुन्हा जिंकली करोडो भारतीयांची मने ! बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सोपवली टी नटराजनच्या हाती