---Advertisement---

महिलांच्या 19 वर्षांखालील टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा विजय; शेफाली बनली ‘प्लेअर ऑफ द मॅच’

On: सोमवार, जानेवारी 16, 2023 5:12 PM
Shafali-Verma
---Advertisement---

सध्या सुरू असलेल्या 19 वर्षांखालील महिला टी20 विश्वचषकात भारतीय संघ धमाकेदार कामगिरी करत आहे. सोमवारी (दि. 16 जानेवारी) भारतीय महिला विरुद्ध यूएई महिला संघात स्पर्धेतील 9वा सामना पार पडला. बेनोनी येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने यूएई संघाला तब्बल 122 धावांनी पराभूत केले. या सामन्यात दिलेल्या योगदानासाठी कर्णधार शेफाली वर्मा हिला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

या सामन्यात यूएई महिला (UAE Women) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, भारतीय महिला (India Women) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. या सामन्यात भारतीय महिलांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेट्स गमावत 219 धावांचा पाऊस पाडला. तसेच, यूएईपुढे 220 धावांचे आव्हान दिले. यूएई संघाला हे आव्हान पार करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत फक्त 97 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना भारताने 122 धावांनी खिशात घातला

यूएईकडून फलंदाजी करताना एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. माहिका गौर हिने 26 धावा, तर लावण्या केनी हिने 24 धावांचे योगदान दिले. इतर एकही फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांना विकेट्स घेण्यात यश आले. शबनम एमडी, तितास साधू, मन्नत कश्यप आणि पार्शवी चोप्रा यांनी प्रत्येकी 1 विकेट आपल्या खिशात घातली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार शेफाली वर्मा (Shafali Verma) हिने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. तिने अवघ्या 34 चेंडूत 78 धावांचे योगदान दिले. या धावा करताना तिने 4 षटकार आणि 12 चौकारांचाही पाऊस पाडला. विशेष म्हणजे, तिने अवघ्या 26 चेंडूत अर्धशतक साकारले होते. तिच्याव्यतिरिक्त श्वेता सेहरावत (Shweta Sehrawat) हिने नाबाद 74 आणि ऋचा घोष (Richa Ghosh) हिने 49 धावांचे योगदान दिले होते. तसेच, गोंगाडी त्रिशा (11) आणि सोनिया मेंधिया हिने नाबाद 2 धावा केल्या.

यावेळी यूएईकडून गोलंदाजी करताना तीन गोलंदाजांंनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये इंधुजा नंदकुमार, माहिका गौर आणि समायरा धरनीधरका यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, भारतीय संघ हा महिला 19 वर्षांखालील टी20 विश्वचषकात 200 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला संघ ठरला. (India Women U19 won by 122 runs against uae)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक ठोकल्यानंतर फिल्डिंगला आला गिल; पठ्ठ्याला पाहून चाहतेही म्हणाले, ‘सारा…सारा’
व्हिडिओ: विराटने धोनीच्या अंदाजात गाजवलं मैदान; ‘तो’ पॉवरफुल फटका मारताच समालोचकही म्हणाले, ‘माही शॉट’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---