---Advertisement---

उद्या होणाऱ्या भारत-इंग्लंड टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्याबद्दल सर्वकाही…

On: बुधवार, मार्च 4, 2020 6:21 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात उद्या(५ मार्च) भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी येथे पहिला उपांत्य सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरुवात होणार आहे.

आत्तापर्यंत भारतीय संघ इंग्लंडला कधीच टी२० विश्वचषकामध्ये पराभूत करु शकलेला नाही. त्यामुळे भारताला उद्याचा सामना जिंकून पहिल्यांदाच इंग्लंडला टी२० विश्वचषकात पराभूत करण्याची तसेच पहिल्यांदाच टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी आहे.

दोन्ही संघ टी२० विश्वचषकात ५ सामन्यामध्ये आत्तापर्यंत आमने-सामने आले आहेत. यातील सर्व सामने भारत पराभूत झाला आहे. याआधी टी२० महिला विश्वचषकात शेवटचे भारत आणि इंग्लंड २०१८मध्ये आमने सामने आले होते. विशेष म्हणजे त्यावेळीही भारत आणि इंग्लंडमध्ये उपांत्य सामनाच झाला होता. पण त्यावेळी इंग्लंडने भारतावर ८ विकेट्सने मात करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

याबरोबरच उद्याच्या सामन्यांवर पावसाचे सावट आहे. जर उद्याच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर सामन्यातील षटके कमी करण्यात येतील. पण जर पावसामुळे सामना झालाच नाही तर आयसीसीच्या नियमानुसार भारत अंतिम सामन्यात जाईल. कारण भारताने साखळी फेरीनंतर अ गटाच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता.

त्याचबरोबर भारत विरुद्ध इंग्लंड संघातील सामन्यानंतर उद्या दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ असा दुसरा उपांत्यपूर्व सामना सिडनी येथेच होणार आहे. हा सामनाही जर पावसामुळे रद्द झाला तर ब गटात साखळी फेरीनंतर अव्वल क्रमांक मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान या खेळाडूंकडे असेल लक्ष – 

या विश्वचषकामध्ये सगळ्यात जास्त धावा इंग्लंडच्या नताली स्काइव्हरने (२०२) केल्या आहेत. तर या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये भारताची शेफाली वर्मा १६१ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

तसेच या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये भारताची पूनम यादव ९ विकेटसह आघाडीवर आहे. तर इंग्लंडची आन्या स्रब्सोल आणि सोफी एक्लेस्टोन संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोघींनी ४ सामन्यांमध्ये प्रत्येकी ८ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

न्यूझीलंड विरुद्ध संधी न मिळालेला हा खेळडू आता उतरणार रणजीच्या फायनलमध्ये

निवडकर्त्यांच्या शर्यतीत भारताचा वेंकटेश प्रसाद आणि हे खेळाडू…

टीम इंडियाविरुद्ध सेमीफायनलमध्ये जिंकायचे असेल तर करावी लागेल ही महत्त्वाची गोष्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---