---Advertisement---

पराभवानंतरही भारतीय महिलांना क्रमवारीत लाभ; मितालीने पुन्हा काबीज केले अव्वलस्थान

On: मंगळवार, सप्टेंबर 21, 2021 5:43 PM
MITALI
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा मंगळवारपासून (२१ सप्टेंबर) सुरु झाला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ९ गडी राखून पराभव केला. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेला खेळाडूंच्या वैयक्तिक क्रमवारीमध्ये भारतीय महिलांना फायदाच झाला आहे.

भारतीय महिलांची क्रमवारीत झेप
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात भारतीय महिलांना दारुण पराभव पत्करावा लागला असला तरी, नव्या आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय महिलांना फायदा झाला. या सामन्यात भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने शानदार अर्धशतक झळकावले. तिने ६१ धावांची खेळी केली. यासह तिने दक्षिण आफ्रिकेच्या लिझे लीला मागे टाकत पुन्हा एकदा अव्वलस्थानी झेप घेतली. मितालीच्या खात्यावर आता ७६२ गुण जमा झाले आहेत. भारताची सलामीवीर स्मृती मंधना ही सुद्धा एका स्थानाच्या प्रगतीसह सातव्या क्रमांकावर पोहोचली.

भारताची सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिला देखिल क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला. झूलन वेस्ट इंडीजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकत ३३१ गुणांसह गोलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारतासाठी एकमेव बळी मिळवणारी पूनम यादव या क्रमवारीत नवव्या क्रमांकावर कायम आहे. महिलांच्या अष्टपैलू क्रमवारीत दीप्ती शर्मा एका स्थानाचा प्रगतीसह चौथ्या स्थानी आली.

भारताची पराभवाने सुरुवात
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी केवळ २२५ धावा धावफलकावर लावल्या. कर्णधार मितालीने भारतासाठी सर्वाधिक ६१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी डार्सी ब्राऊनने चार बळी मिळवले. प्रत्युत्तरात रॅचेल हेन्स, एलिसा हिली व मेग लेनिंग यांनी अर्धशतके ठोकत ४१ षटकात सामना जिंकला. ब्राऊन हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी खेळला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या-

मितालीच्या हेल्मेटवर लागला बाऊंसर आणि भारतीय चाहत्यांच्या काळजात झाले धस्स; पाहा व्हिडिओ

विराटनंतर आरसीबीचा कर्णधार कोण? ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार

फॉर्मात असलेल्या राहुलची बॅट राजस्थानविरुद्ध ओकणार आग, ‘इतक्या’ धावा चोपत करेल मोठा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---