ऑस्ट्रेलियन महिला संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. मालिकेतील दुसरा टी-20 सामना रविवारी (11 डिसेंबर) खेळला गेला, ज्यात भारतीय संघाने बाजी मारली. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील या सामन्यात सुपर ओव्हरपर्यंत पोहोचला. सुपर ओव्हरमध्ये भारताने 20 धावा केली, तर ऑस्ट्रेलिया संघ या निर्णायक षटकात 16 धावांपर्यंत मजल मारू शकला.
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघात खेळला गेलेला हा दुसरा टी-20 सामना रविवारी डी वाय पाटील स्टेडियवर खेळला गेला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाहुण्या ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंनी धुवाधार खेळी केली. सलामीला आलेली एलिसा हिली (Alyssa Healy) या सामन्यात स्वस्तात बाद झील. तिने 15 चेंडूत 25 धावा करून विकेट गमावली. पण त्यानंतर बॅथ मुनी (Beth Mooney) आणि तहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) यांनी महत्वपूर्ण खेळी केली. या दोघींनी अनुक्रमे 82 आणि 70 धावांची खेळी करत संघाची धावसंख्या 1 बाद 187 पर्यंत पोहोचवली.
प्रत्युत्तरात भारतासाठी सलामीवीर स्म्रिती मंधाना (Smriti Mandhana) हिने सर्वात जास्त धावा केल्या. स्म्रितीने 49 चेंडूत 79 धावा केल्या आणि संघाचा चांगली सुरुवात दिली. तिच्या साथीने सलामीला आलेली शेफाली वर्मा (Shafali Verma) 23 चेंडूत 34 धावा केल्या. मर्यादित 20 षटकांमध्ये सामना निकाली लागला नाही. लक्ष्याचा पाढलाग करताना भारताने सामना ऑस्ट्रेलियाची बोरबरी केल्यामुळे पंचांनी सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेतला.
सुपर ओव्हरमध्ये भारतासाठी स्म्रिती मंथाना आणि रिचा घोष खेळपट्टीवर आल्या आणि त्यांनी 6 चेंडूत 20 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियान फलंदाज मात्र 6 चेंडूत 16 धावांपर्यंत मजल मारू शकल्या. परिणामी मालिकेतील हा दुसरा टी-20 सामना भारताने नावावर केला. उभय संघांतील ही टी-20 मालिका पाच सामन्यांची असून सध्या दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीवर आहेत. उभय संघांतील तिसरा सामना बुधवारी (14 डिसेंबर) मुंबईच्या ब्रेबॉर्न्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. (India W won against australia W in super over.)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने वाढल्या टीम इंडियाच्या अडचणी; WTC अंतिम फेरीसाठी करावा लागणार संघर्ष
ईशानच्या द्विशतकानंतर संपणार ‘या’ खेळाडूची कारकीर्द? दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य