अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघांत मालिकेतील चौथा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारताने एका डावाची आघाडी घेत २५ धावांनी इंग्लंडला पराभूत केले आहे. यासह ३-१ ची आघाडी घेत यजमानांनी ही कसोटी मालिका खिशात घातली. या विजयाबरोबरच भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. या सामन्यात त्यांचा प्रतिस्पर्धी संघ न्यूझीलंड असेल.
भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्यासाठी २ किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांनी या कसोटी मालिकेत विजय मिळवायचा होता. तिसऱ्या कसोटी सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवत भारताने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली होती. दुसरीकडे भारताच्या विजयानंतर इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते.
परंतु भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे आव्हान कायम असल्याने चौथ्या कसोटी सामन्याच्या निकालावर न्यूझीलंडचा प्रतिस्पर्धी संघ ठरणार होता. जर भारताने चौथा कसोटी सामना गमावला तर ऑस्ट्रेलियाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळणार होता.
अखेर भारताने अतिशय महत्त्वाचा असलेला चौथा कसोटी सामना जिंकत ३-१ ने मालिकेत विजयी पताका झळकावली. याबरोबरच त्यांनी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ७२.२ टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळवला आहे. तर इंग्लंड संघ ६१.४ टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया ६९.२ टक्केवारीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
That victory against England means India finish the league phase of the inaugural ICC World Test Championship with a fine view from the top of the table 🔝#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/rXFiKPXdB7
— ICC (@ICC) March 6, 2021
लॉर्ड्सवर होणार अंतिम सामना
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने १ ऑगस्ट २०१९ पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना यावर्षी जून महिन्यात १८ जून ते २२ जून दरम्यान लॉर्डस मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या निर्णयामुळे न्यूझीलंडला अंतिम सामन्याचे तिकीट
ऑस्ट्रेलियाने काही दिवसांपूर्वी आपला दक्षिण आफ्रिकेचा नियोजित दौरा रद्द केला. दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाची सद्य परिस्थिती बघता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच कारणाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत महत्वाचे बदल झाले.
न्यूझीलंडचा संघ पाच मालिकांनंतर ११ सामन्यातील ७०.० अशा विजयाच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड यानंतर कोणतीही मालिका खेळणार नाही आहे. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: कॅचमास्टर अजिंक्य! अवघ्या काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता पकडला भन्नाट झेल
अजब! डोळ्याचे पाते लवते न लवते तोच पंतने चेंडू छातीवर घेत ओली पोपला पाठवले तंबूत, पाहा व्हिडीओ