हांगझूमध्ये सुरू असलेल्या आशियाई गेम्स 2023मध्ये बुधवारी (4 ऑक्टोबर) भारताची चमकदार कामगिरी सुरू राहिली. भारताला स्पर्धेतील 18 वे सुवर्ण पदक 4×400 मीटर रिले स्पर्धेत मिळाले. नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये भारताला सलग दुसरे सुवर्ण पदक मुहम्मद याहिया, अमोज जॅकब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश या चोघांच्या जोडीने मिळवून दिले.
पुरुषांच्या रिलेमध्ये भारताला सुवर्ण मिळवून देणाऱ्या चौघांनी अवघ्या 3:03:81 मिनिटांमध्ये अंतर पूर्ण केले. आशीयाई गेम्स 2023मधील भारताला मिळालेले हे आतापर्यंतचे 18 वे सुवर्णपदक ठरले. पुरषांच्या 4×400 मीटर रिले स्पर्धेप्रमाणेच महिला 4×400 मीटर रिले स्पर्धेतही भारताची कामगिरी उल्लेखणीय राहिली. विथ्या रामराज, ऐश्वर्या मिश्रा, प्राची आणि सुभा वेंकटेश या चोघांनी महिलांच्या 4×400 मीटर रिले स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून दिले.
India won the Gold in 4×400m relay in Asian Games..!!!
– 18th Gold medal in this Asian Games & created history.pic.twitter.com/PjK55HlwPa
— Johns. (@CricCrazyJohns) October 4, 2023
(India won the Gold in 4×400m relay in Asian Games.)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । चॅम्पियन नीरजने पुन्हा जिंकले सुवर्ण, भालाफेक स्पर्धेचे रौप्य पदकही भारताकडेच
World Cup 2023 । स्पर्धेच्या एक दिवस आधी इंग्लंडची ताकद झाली कमी, दिग्गज खेळाडू संघातून बाहेर!