कटक। आज(22 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बाराबती स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात नवदीप सैनीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तो या सामन्यातून वनडे पदार्पण करेल. वनडे पदार्पण करणारा तो भारताचा 229 वा खेळाडू आहे.
सैनीला याआधी या वनडे मालिकेसाठी निवडण्यात आले नव्हते, परंतू दुसऱ्या सामन्यानंतर दीपक चाहर दुखापतग्रस्त झाल्याने सैनीला संघात संधी देण्यात आली.
तसेच वेस्ट इंडिजने 11 जणांच्या संघात कोणताही बदल केलेला नाही. त्यांनी दुसऱ्या वनडेत खेळवलेला संघच या वनडेसाठीही कायम ठेवला आहे.
या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. याचमुळे आजचा सामना निर्णायक सामना ठरणार आहे.
असे आहेत 11 जणांचे संघ –
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज – इव्हिन लुईस, शाय होप (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रोस्टन चेस, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, खॅरी पिएर, शेल्डन कॉट्रेल.
मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी म्हणतो, आयपीएलमध्ये ही गोष्ट करणे सर्वात कठीण
वाचा- 👉https://t.co/tD8MkmD1oK👈#म #मराठी #Cricket #IPL2020Auction @Mazi_Marathi @MarathiRT— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019
शिवम दुबे आणि जेसन होल्डरचा हा खास व्हिडिओ सोशल मिडियावर होत आहे व्हायरल
वाचा- 👉 https://t.co/oqamvSxXUE👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi@MarathiRT #shivamdube
— Maha Sports (@Maha_Sports) December 21, 2019