2024चा झालेला आयसीसी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) फायनल सामना भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात खेळला गेला. दोन्ही संघात रोमांचक लढत पाहायला मिळाली. अखेर भारताने बाजी मारत विश्वचषकावर नाव कोरले. पण भारताने दक्षिण आफ्रिकेला याआधी देखील सर्वात खोल जखम दिली होती. आफ्रिकन संघ गेल्या 31 वर्षांपासून त्याचा बदला घेऊ शकला नाही. या बातमीद्वारे आपण त्या थरारक सामन्याविषयी जाणून घेऊया.
1993 साली आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने सेमीफानलमध्ये धडक मारली होती. 1983च्या विश्वचषकानंतर ट्रॉफीचा दुष्काळ असल्याने भारताला तो संपवण्याची सुवर्णसंधी होती. या सामन्यात आफ्रिकन संघाने 196 धावांच्या लक्ष्याचा आरामात पाठलाग करताना कोलकाताच्या मैदानावर जवळपास लाखो प्रेक्षकांनी श्वास रोखून धरला होता.
त्यावेळी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि अजय जडेजा (Ajay Jadeja) यांनी घेतलेली मेहनत व्यर्थ ठरेल असे दिसत होते. दोघांनी मिळून आफ्रिकेला 145 धावांपर्यंत नेले होते. पण आफ्रिकेच्या मॅकमिलन, डेव्ह रिचर्डसन यांनी 44 धावा जोडून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते. आफ्रिकेला शेवटच्या षटकात केवळ 6 धावांची गरज असताना लाखो प्रेक्षकांसमोर कर्णधार अझहरलाही आपले डोके टेकवावे लागले असते.
भारत-दक्षिण आफ्रिका संघात शेवटचे षटक टाकणारा खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) होता, जो फक्त 20 वर्षांचा होता. तो काळ असा होता जेव्हा सचिन महान फलंदाज किंवा मास्टर ब्लास्टर नव्हता. पण तेव्हा त्याने शेवटचे षटक टाकण्यासाठी हात वर केला, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. तेंडुलकरने त्या षटकात प्रत्येकी 1 धाव घेण्यासाठी आफ्रिकन फलंदाजांना चितपट केले. या थरारक सामन्यात भारताने 2 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. विजयानंतर कोलकाताच्या मैदानावर शेवटी सचिनच्या नावाचा गजर चालू झाला होता.
महत्त्त्वाच्या बातम्या-
कष्टाचं चीज झालं! टी20 वर्ल्डकप विजेत्या खेळाडूला मिळालं पोलिसात डीएसपी पद
बीसीसीआयनं बदलले क्रिकेटचे नियम, या स्पर्धेपासून होणार लागू
बाबर आझमनं कसोटीमध्ये शेवटचं अर्धशतक कधी ठोकलं होतं? अशा प्रकारे बनला हिरोचा झिरो!