भारतीय स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ऑलिंपिकमध्ये पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने धुमाकूळ घालण्यास सज्ज झालेली आहे. पीव्ही सिंधूने टोकियोला ऑलिंपिक स्पर्धेसाठी रवाना होणार अगोदर विशेष पद्धतीने तयारी सुरू केली आहे. ही ऑलिंपिकची भव्यस्पर्धा 23 जुलै पासून सुरू होणार असून 8 ऑगस्टला संपणार आहे. ही स्पर्धा जपानच्या राजधानी टोकियोमध्ये आयोजित केली आहे.
पीव्ही सिंधूच्या नखांवर ऑलिंपिकचे नेल आर्ट
पीव्ही सिंधूने 13 जुलैच्या संध्याकाळी एक फोटो ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट केला होता. ज्यामध्ये सिंधूने त्याच्या डाव्या हाताच्या नखांवर नेलपेंट लावली आहे, त्यात तिने अंगठ्याच्या शेजारच्या बोटाला आणि करंगळीला गुलाबी नेल पेंट लावल्याचे पाहायला मिळाला आहे. तर मधली दोन्ही बोटांवर सिंधूने ऑलिंपिकचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे 5 गोलांचे नेल आर्टने बनवले आहे.
#olympicfever #tokyo2021 #10daystogo pic.twitter.com/yPOcRjgFR7
— Pvsindhu (@Pvsindhu1) July 13, 2021
ऑलिंपिकमधील 5 गोलचा अर्थ
आपण ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 5 गोल नेहमीच पाहिले असतील. हे ऑलिंपिकच्या भव्यदिव्य अशा स्पर्धेचे प्रतीक आहे. यात लाल, पिवळ्या, हिरव्या, काळ्या आणि निळ्या रंगाचे गोल आहेत. जे आशिया, युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ओसिनिया, युरोप आणि आफ्रिका अशा या मुख्य खंडांचे प्रतिनिधित्व म्हणून ओळखले जाते. यामुळेच पीव्ही सिंधूने ऑलिम्पिक गोलला तिच्या नखांवर काढले आहे.
रियो ऑलिंपिक स्पर्धेत जिंकले रौप्यपदक
भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू ही भारताच्या इतिहासातील दुसरी खेळाडू आहे, जिने बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक स्पर्धेत पदक जिंकले आहे. पीव्ही सिंधूने रियो डी जनेरीयो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 2016 मध्ये रौप्य पदक जिंकले होते. पीव्ही सिंधू या ऑलिंपिक स्पर्धेत अंतिम सामन्यात स्पेनची कॅरोलीना मारनकडून पराभूत झाली होती. तिच्यापूर्वी सायना नेहवालने २०१२ साली कांस्यपदक जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
डेव्हिड भाऊ जोरात! वॉर्नरने आता थेट अक्षय कुमारची केली नक्कल; म्हणाला, ‘सर्वात भारी कोणी केलंय?’
भारत दुसऱ्यांदा करणार बॅडमिंटन चॅम्पियनशीपचे आयोजन, ‘या’ वर्षी पार पडणार ही मोठी स्पर्धा
ईशांत शर्माला गोल्फ खेळताना पाहून युवराज सिंगने घेतली त्याची फिरकी; म्हणाला, ‘लंबू जी, जरा…’