टोकियो ऑलिंपिक्स २०२०च्या पाचव्या दिवसाला (२७ जुलै) सुरुवात झाली आहे. यात बॅडमिंटन खेळातील ग्रूप ए मधील पुरुषांच्या दुहेरी गटातील सामना भारत आणि ग्रेट ब्रिटन संघात पार पडला. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रँकिरेड्डी- चिराग शेट्टी आणि ग्रेट ब्रिटचे बॅडमिंटनपटू बेन लेन आणि सिन वेंडी हे या सामन्यात आमने- सामने होते. या सामन्यात भारतीय संघाने २-० ने सामना जिंकत विजयी पताका फडकवला.
भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक आणि चिराग यांनी पहिल्या सेटमध्ये ग्रेट ब्रिटनचे बॅडमिंटनपटू बेन आणि सिनला २१- १७ अशी मात दिली. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्येही भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंना २१- १९ ने मात दिली. (Indian Badminton Players Satwik Sairaj And Chirag Shetty Won Mens Doubles Against Great Britain 2-0)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Badminton
Men's Doubles Group A Results@Shettychirag04 & @satwiksairaj put up a dominating win in the final group match. Finish 3rd in Group A, missing out on qualifying for the QFs. Great effort champs🙌👏 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/QhrIZaNQ0a— Team India (@WeAreTeamIndia) July 27, 2021
यापूर्वी सोमवारी (२६ जुलै) इंडोनेशियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटूंच्या जोडींपैकी एकाला सामन्यादरम्यान उजव्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरही कोर्टवर आले होते. परंतु त्या बॅडमिंटनपटूने जिद्दीने खेळ पुढे सुरू ठेवला. मात्र, अखेर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान गिदोन आणि सुकामुल्जोपुढे चिराग आणि सात्विकचा पहिल्या सेटमध्ये १३-२१ ने आणि दुसऱ्या सेटमध्ये १२-२१ ने दुसरा सेटही गमावला होता.
विशेष म्हणजे, त्यांनी तीनपैकी दोन सामने जिंकूनही स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. चीनच्या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला पराभूत केल्याने भारतीय खेळाडूंवर ही नामुष्की ओढवली आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?
-तिरंदाजीत भारताने खाल्ला सपाटून मार; दक्षिण कोरियाने फडकावली विजयी पताका