भारत आणि श्रीलंका संघात टी२० सामन्यांची मालिका खेळण्यात आली. या मालिकेत भारतीय संघाला १-२ ने पराभव पत्करावा लागला आहे. या ३ टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघाने विजय मिळवून मालिका १-१ ने बरोबरीत केला. भारतीय संघाला मालिका जिंकण्यासाठी गुरुवारचा (३१ जुलै) शेवटचा टी२० सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा होता. पण भारताचे फलंदाज मैदानावर टिकून राहू शकले नाहीत. त्यामुळे भारतीय संघ फक्त ८१ धावा काढू शकला. परिणामी त्यांना ७ विकेट्सने निर्णायक सामना आणि टी२० मालिकाही गमवावी लागली.
या मालिकेतून टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंना संघात स्थान मिळवण्याची सुवर्ण संधी होती. परंतु आता काही खेळाडूंचे टी२० संघात स्थान मिळण्याचे मार्ग बंद झाल्यासारखे दिसत आहेत. या यादीतील पहिले नाव संजू सॅमसनचे आहे. संजू सॅमसनने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे असे म्हणणे देखील चुकीचे नाही ठरणार.
संजू सॅमसनचा टी२० विश्वचषकातील मार्ग झाला बंद!
सर्वांच्या नजरा भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेवर होत्या. कारण टी२० विश्वचषक स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे युवा भारतीय खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची ही एक सुवर्णसंधी होती. परंतु काही खेळाडूंना या संधीचे सोने करता आले नाही. त्याचबरोबर काही खेळाडूंनी विश्वचषक संघात स्थान मिळवण्याचा मार्ग स्वतः बंद केला आहे. आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारा फलंदाज संजू सॅमसनला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघाचा पात्र ठरणारा खेळाडू मानले जात होता. परंतु संजू सॅमसनने श्रीलंका दौऱ्यावर खराब प्रदर्शन करून स्वतःचे मोठे नुकसान करून घेतले आहे.
या संपूर्ण दौर्यावर पहिला वनडे सामना वगळता संजू सॅमसनला सर्व सामन्यात खेळवण्यात आले होते. परंतु त्याने फलंदाजी करताना एक अर्धशतकही झळकावले देखील नाही. इतकेच नाही तर निर्णयाक टी२० सामन्यात त्याने खातेही उघडले नाही आणि तो तंबूत परतला. संपूर्ण दौऱ्यात संजू सॅमसनच्या कामगिरीमध्ये सुधारणांऐवजी घसरण होत गेली. अशा परिस्थितीत त्याच्यासाठी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळणे जवळपास अशक्य झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतात परतल्यानंतर आपल्या परिसरातून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सला शोधतेय मिराबाई; पण काय आहे कारण?
श्रीलंका संघ लागला टी२० विश्वचषकाच्या तयारीला; दक्षिण आफ्रिकेसोबत करणार दोन हात, ‘असे’ आहे वेळापत्रक
लंडनमध्ये विराटची पत्नी अनुष्का बनली फोटोग्राफर; ‘या’ अंदाजातील फोटो केले क्लिक