---Advertisement---

क्रिकेटसाठी सोडला भारत, अमेरिकेच्या संघाचा बनला कर्णधार; आता पहिल्याच सामन्यात चोपल्या नाबाद ९९ धावा

On: मंगळवार, ऑगस्ट 3, 2021 3:12 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचे लाखो क्रिकेटपटूंचे स्वप्न असते. त्यासाठी ते जीवाचं रान देखील करतात. पण एखादा अपवाद असतो जो वेगळी वाट धरतो. असाच एक खेळाडू आहे, 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळलेला स्मित पटेल. आता तो अमेरिकेत आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत आहे. 31 जुलैपासून अमेरिकेत सुरू झालेल्या ‘मायनर लीग क्रिकेट यूएसए 2021’ मध्ये स्मित पटेल ‘मॅनहॅटन यॉर्कर्सचा’ कर्णधार आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला आहे.

स्मित पटेलने ऑरलांडो गॅलेक्सीविरुद्ध नाबाद 99 धावा करून संघाचा विजय निश्चित केला. वयाच्या 28 व्या वर्षी स्मित पटेलने भारतीय क्रिकेटला निरोप दिला. त्याने यावर्षी बडोद्यासाठी ‘ग्रुप ए’ चे सामने खेळले होते. पण त्याचे भविष्य पाहता त्याने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेत सुरू असलेली ‘मायनर लीग क्रिकेट’ स्पर्धा गेल्यावर्षी सुरू होणार होती. पण कोरोना व्हायरसमुळे ती पुढे ढकलण्यात आली. 2023 पासून सुरू होणाऱ्या 6 संघांच्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. कोरे अँडरसन, सामी अस्लम आणि शेहान जयसूर्यासारखे खेळाडूही या लीगमध्ये खेळत आहेत.

स्मित पटेल हा 19 वर्षांखालील भारतीय संघाचा सदस्य होता. तो 2012 मध्ये विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य देखील होता. अंतिम सामन्यात स्मित पटेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 62 धावा केल्या होत्या. त्यावेळी भारत 226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. भारतीय युवा संघाने 97 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. अशावेळी कर्णधार उन्मुक्त चंदने नाबाद 111 धावा केल्या आणि स्मित पटेलनेही नाबाद अर्धशतक झळकावले होके, ज्यामुळे भारतीय संघ विश्वविजेता बनला होता.

यानंतर स्मित पटेलला बडोद्याच्या ‘रणजी संघात’ स्थान मिळाले होते. त्याने 55 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तसेच 43 लिस्ट ए सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 28 देशांतर्गत टी-20 सामनेही खेळले आहेत. स्मित पटेलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 13 शतके केली होती. पण त्याला भारतात त्याच्या भविष्याविषयी शंका होती. म्हणून तो आता अमेरिकेत क्रिकेट खेळत आहे. स्मित पटेल कॅरिबियन प्रीमियर लीगमध्येही खेळताना दिसेल. स्मित बार्बाडोस ट्रायडंट्स संघाचा देखील सदस्य आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पक्कच समजा! नॉटिंघम कसोटीत ‘हा’च असणार रोहितचा सलामी जोडीदार, नुकतंच झळकावलंय शतक

काश्मीर प्रीमियर लीग रद्द होण्यासाठी बीसीसीआयचे सर्वतोपरी प्रयत्न! आयसीसीला लिहिले पत्र

पत्नी अनुष्कासाठी विराट बनला फोटोग्राफर, तिनेही किल्लर स्माईल देत कोहलीला केले घायाळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---