भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या संघाचे नेतृत्व विराट कोहली करत आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला आपल्या परिवारासोबत जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे विराटसोबत या दौऱ्यावर त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका देखील गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सोशल मीडियावर दररोज आपले नवनवीन फोटो किंवा व्हिडिओ शेअऱ करत आहेत.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी डरहॅम आणि नॉटिंगहॅममध्ये फिरताना दिसून येत आहेत. तिथूनही ते फोटो शेअर करत आहेत. कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर विराट आपली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकासोबत वेळ घालवत आहे.
विराट आणि अनुष्काचे चाहते इंग्लंडमधून शेअर केलेले फोटो पाहून खूप प्रभावित झाले आहेत. अलीकडेच अनुष्का शर्माने तिचे काही फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपल्या स्मितहास्यासह खूप सुंदर दिसत आहे. या पोस्ट केलेल्या फोटोला कमेंट करत विराटने तिला तिला विचारले की, तिचे हे फोटो कोणी काढले आहेत?
विराट कोहलीच्या या प्रश्नाला अनुष्काने देखील गमतीशीर उत्तर दिले आहे. विराटच्या प्रश्नाला उत्तर देत अनुष्काने लिहिले की, ‘विराट कोहली, तो माझा खूप चांगला चाहता आहे.’ चाहत्यांना विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या कमेंटमधील ही मजा खूप आवडली आहे.
त्याचबरोबर अनुष्का शर्माच्या या फोटोला स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे. अनुष्का शर्माच्या या फोटोला सानिया मिर्झाने दोन हार्ट इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली आहे. या व्यतिरिक्त चाहत्यांनी विराट-अनुष्काच्या या फ्लर्टिंगवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
यापूर्वी विराट कोहलीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले होते. मात्र, विराट कोहलीने या फोटोचे श्रेय अनुष्का शर्माला दिले होते. आजकाल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा भारतीय संघाच्या इतर खेळाडूंसह आणि इंग्लंडमध्ये त्यांच्या कुटुंबीयांसोबत खूप आनंद घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
प्लेइंग इलेव्हनबद्दल वसीम जाफरचा कोहली अन् शास्त्रींना ‘गुप्त संदेश’, पाहा तुम्हाला समजतोय का?
पुजारा इंग्लंडविरुद्ध करणार सलामीला फलंदाजी? उपकर्णधार रहाणेने दिले ‘हे’ उत्तर
‘नेक्स्ट स्टॉप इंग्लंड’! अखेर सूर्यकुमार अन् पृथ्वीने इंग्लंडसाठी भरली उड्डाण, फोटो केले शेअर