भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. तर या दौऱ्यावर भारतीय संघाला श्रीलंका विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौर्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादवचा देखील समावेश आहे. तसेच भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री भारताच्या कसोटी संघासह इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी राहुल द्रविडला प्रभारी प्रशिक्षकपद देण्यात आले आहे. त्यामुळे द्रविडबद्दल सूर्यकुमारने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
यावर्षी इंग्लंडविरुद्ध झालेल्या घरच्या मैदानावरील टी20 मालिकेतून पदार्पणान करताना सूर्यकुमारने सर्वांना प्रभावित केले होते. आता तो शिखर धवनच्या नेतृत्वातील मर्यादीत षटकांच्या भारतीय संघासह श्रीलंका दौर्यावर गेला आहे. हा भारतीय संघ 13 जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 3 टी 20 मालिका खेळणार आहे.
सूर्यकुमार यादव या दौऱ्याबद्दल ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘आमच्यावर दबाव नक्कीच असेल. जर आमच्यावर दबाव नसला तर खेळायला मजा येणारच नाही. ही मालिका आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे आणि मी खरोखरच या प्रतीक्षेत देखील आहे.’
सूर्यकुमार यादवला जेव्हा विचारण्यात आले होते की पदार्पण मालिकेत यशस्वी होण्यामुळे तुला दबावाचा सामना करण्यासाठी काही मदत मिळाली आहे का? यावर उत्तर देत सूर्यकुमार म्हणाला की, “मला वाटते, इंग्लंडविरुद्धची पहिली मालिका पूर्ण वेगळे आव्हान होते आणि एक फलंदाज म्हणून जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा प्रत्येक वेळी आपण एक वेगळा खेळ खेळत असतो, प्रत्येक वेळी आपण काही तरी नवीन सुरूवात करत असतो.”
🗣️ 🗣️: The side is excited for the Sri Lanka tour with Rahul Dravid heading #TeamIndia's coaching staff: @surya_14kumar #SLvIND pic.twitter.com/PyspvNlusL
— BCCI (@BCCI) July 6, 2021
सूर्यकुमार पुढे म्हणाला की, ‘या मालिकेतही मला पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल, कारण ती एक वेगळी मालिका होती आणि ही एक वेगळी मालिका आहे. परंतु, दोन्ही मालिकेत आव्हाने सारखीच आहेत. मला मैदानावर जाऊन तसेच प्रदर्शन करायचे आहे, जसे मी या अगोदरच्या मालिकेत केले होते.’
सूर्यकुमार पुढे म्हणाला की, ‘पहिल्यांदाच राहुल द्रविड सर यांच्या मार्गदर्शना खाली खेळण्यास मी खूप उत्सुक आहे. प्रत्येकासाठी उत्कृष्ट क्षण आहे. परंतु, या कोरोनाच्या महामारीमुळे दौरा करणे हेच सर्वात मोठे आव्हान आहे. त्याच बरोबर या दौर्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे राहुल सर आपल्या सोबत आहेत. मी त्याच्याबद्दल खूप काही ऐकले आहे.’
सूर्यकुमार पुढे म्हणाला की, ‘मला वाटते की राहुल सरांसोबतचा हा माझा पहिलाच दौरा आहे. मी बर्याच खेळाडूंकडून राहुल सरांबद्दल खूप काही ऐकले आहे की जेव्हा ते या एक प्रशिक्षक म्हणून बोलतात तेव्हा ते खूप शांत आणि एकाग्र असतात.’
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौऱ्यात ऋतुराज गायकवाड वापरणार धोनीने दिलेला ‘हा’ गुरुमंत्र
असा उचलावा ब्रेकचा फायदा! ‘या’ दोन भारतीय धुरंधरांनी इंग्लंडमध्ये घेतला कॉफीचा आनंद