भारत आज आपला 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. त्याचवेळी हैदराबादमध्ये भारत आणि इंग्लंडचे संघ आमनेसामने आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, प्रजासत्ताक दिनी भारताकडून शतक झळकावण्याचा पराक्रम आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाने केला आहे. खरंतर विराट कोहली याने प्रजासत्ताक दिनी शतक झळकावले होते. याशिवाय भारताचे इतर फलंदाजही यात अपयशी ठरले आहेत. पण विराट कोहलीने हे शतक केव्हा केले हे तुम्हाला माहिती आहे का? विराट कोहलीने 2012 मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.
त्या ॲडलेड कसोटीत सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवागसारखे फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले होते. पण विराट कोहलीने 26 जानेवारीला शतक झळकावून इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटीत विराट कोहलीने 213 चेंडूत 116 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. मात्र यानंतर एकाही भारतीय फलंदाजाला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. म्हणजेच 26 जानेवारीला कोणालाही शतक करता आले नाही.
सध्या भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. मात्र, विराट कोहली या मालिकेतील पहिले 2 कसोटी सामने खेळू शकणार नाही. विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे नाव मागे घेतले. मात्र या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहली खेळताना दिसणार आहे. अलीकडेच विराट कोहली भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत दिसला होता. दोन्ही संघांमधील ही मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. (Indian batsmen who scored a century on January 26 see who did it)
हेही वाचा
ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये मोठा उलटफेर! यानिक सिनरने जोकोविचला दाखवला बाहेरचा रस्ता
पुजारा-रहाणेचं करिअर संपलं? रोहित शर्माच्या ‘या’ निर्णयामुळे चर्चांना उधान