---Advertisement---

एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी

On: रविवार, ऑक्टोबर 30, 2022 7:11 PM
Suryakumar-Yadav-T20-World-Cup
---Advertisement---

भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव टी20 विश्वचषक 2022मध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे. सूर्याने मागील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यानंतर त्याने रविवारी (दि. 30 ऑक्टोबर) पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे, या सामन्यात त्याने खास कारनामा केला. चला तर सूर्याचा कारनामा जाणून घेऊया…

झाले असे की, या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 133 धावा चोपल्या. या धावा करताना दोन्ही सलामीवीरांना फार काही चांगली कामगिरी करता आली नाही. केएल राहुल 9  धावांवर, तर रोहित 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीदेखील 12 धावा करत तंबूत गेला. मात्र, चौथ्या क्रमांकावर उतरलेला सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने संघाकडून सर्वाधिक धावा करत अर्धशतक साकारले.

याव्यतिरिक्त या सामन्यात संधी देण्यात आलेला दीपक हुड्डा शून्य धावेवर बाद झाला. हार्दिक पंड्याला फक्त 2 धावा करण्यात यश आले. तसेच, फिनिशर म्हणून ओळखला जाणारा दिनेश कार्तिक 6 आणि फिरकीपटू आर अश्विन 7 धावांवर बाद झाला. यावेळी मोहम्मद शमी शून्य धावेवर धावबाद झाला. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमार (4) आणि अर्शदीप सिंग (2) धावांवर नाबाद राहिले.

यावेळी झाले असे की, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने संपूर्ण भारतीय संघातील इतर खेळाडूंपेक्षा जास्त धावा चोपल्या. सूर्याने 40 चेंडूंचा सामना करताना 170च्या स्ट्राईक रेटने 68 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 3 षटकार आणि 6 चौकारही मारले. दुसरीकडे, भारतीय संघाच्या इतर खेळाडूंनी 80 चेंडूत फक्त 57 धावा काढल्या. यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित अन् विराट फ्लॉप, पण सूर्या ऑन फायर, टी20 विश्वचषकात भारतासाठी ठोकल्या बॅक टू बॅक फिफ्टी
विराटने गाजवला टी20 विश्वचषक, तब्बल 83.41च्या सरासरीने चोपल्यात 1000 धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---