आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने मोठी झेप घेतली. सिराज आता न्यूंझीलंडचा ट्रेंट बोल्ड आणि ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूड यांना मागे टाकत क्रमांक एकचा वनडे गोलंदाज बनला आहे. मागच्या एका वर्षात सिराजने स्वतःच्या वनडे प्रदर्शनात जबरदस्त सुधारणा केली. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने अशाच पद्धतीने उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला.
मोहम्मद सिराज याचे नाव आता भारतीय क्रिकेटच्या इतिहासाहत एका खास यादीत जोडले गेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपर्यंत अनेक दिग्गज गोलंदाज होऊन गेले आहेत. यात दिग्गजांमध्ये काही मोजक्याच भारतीय गोलंदाजांना वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक मिलाला. सिराज आता वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावणाऱ्या भारतीयांच्या यादीत नव्याने जोडला गेला आहे. यापूर्वी असी कामगिरी करणाऱ्यांमध्ये कपिल देव आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाचा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. चर तर नजर टाकूनये वनडे क्रमवारीत यापूर्वी पहिला क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय गोलंदाजांवर.
जसप्रीत बुमराह –
मोहम्मद सिराजच्या आधी भारतासाठी अलिकडच्या काळात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने वनडे क्रमवारीत पहिला क्रमाक पटकावला आहे. वनडे क्रमवारीत बुमराहने 2018, 2019, 2020 आणि 2022 या वर्षांमध्ये पहिला क्रमांक पटकापला आहे. मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर बुमरहा क्रमांक एकचा वनडे गोलंदाज बनला होता. त्यानंतर त्याला ही कामगिरी पुन्हा करता आली नाहीये. बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 72 वनडे सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेतल्या आहे. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 4.63 होता. बुमराहची आकडेवारी जरी जबरदस्त असली, तरी मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीच्या कारणास्तव त्याला वारंवार संघातून बाहेर ठेवले गेले आहे. त्याची फिटनेस संघासाठी येत्या काळात महत्वाचा मुद्दा असेल.
रविंद्र जडेजा –
भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकापला होता. 2013 साली भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने जबरदस्त प्रदर्शन केले आणि वनडे क्रमवारीत क्रमांक एकचा गोलंदाज ठरला. जडेजाने त्या संपूर्ण वर्षात एकूण 52 विकेट्स घेतल्या होत्या. भारताने 2013 मध्ये जिंकलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविंद्र जडेजाचे योगदान महत्वपू्र्ण होते. जडेजाने या स्पर्धेत सर्वाधिक 12 विकेट्स घेतल्या होत्या.
अनिल कुंबळे –
भारतीय संघाच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी देखील 1996 मध्ये ही कामगिरी केली होती. 1996 साली कुंबळेंनी केलेल्या गोलंदाजीमुळे अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कुंबळेंनी 20.24 च्या सरासरीने या एका वर्षात 61 वनडे विकेट्स घेतल्या होत्या. अनिक कुंबळे यांच्या नावावर भारतीय संघासाठी सर्वाधिक वनडे विकेट्सचा विक्रम देखील आहे. त्यांनी कारकिर्दीतील एकूण 271 वनडे सामन्यांमध्ये 337 विकेट्स घेतल्या आहेत.
कपिल देव –
भारतीय संघाला 1983 साली पहिला विश्वचषक जिंकवून देणारे कपिल देव (Kapil Dev) यांचे नाव देखील या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाला ज्या काळात वेगवान गोलंदाजांची कमतरता होती, त्यावेळी कपिल देवने आयसीसी वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला होता. 1988 साली त्यांनी 22.14 च्या सरासरीने 21 वनडे विकेट्स घेतल्या होत्या आणि यासाठी वनडे गोलंदाजांमध्ये त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते. गोलंदाजांमध्ये कर्णधार कपिल देव पहिल्या क्रमांकापल पोहोचल्यामुळे संघातीन इतर खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळाले होते.
मनिंदर सिंग –
वनडे क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावण्याचा मान सर्वात आधी मनिंदर सिंग (Maninder Singh) यांनी पटकापला. सिंग यांनी 1987 साली ही कामगिरी केली होती. जगभरात वेगवान गोलंदाजांचा दबदबा असताना सिंग यांनी मात्र स्वतःच्या फिरकीच्या जोरावर वनडे क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला होता. त्यांनी 1987 मध्ये 28.47 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांची वनडे कारकीर्द जास्त मोठी नव्हती. कारकिर्दीतील एकूण 59 वनडे सामन्यांमध्ये 66 विकेट्स घेतल्या. (Indian bowlers who became number 1 in ICC ODI rankings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केवळ 7 वनडे खेळलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणतोय, “आकडेवारीत विराट माझ्यानंतरच”
BREAKING: अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात भारतीय मुलींची सेमी-फायनलमध्ये धडक