---Advertisement---

संपूर्ण यादी – क्रिकेट इतिहासात हॅट्रिक घेणारे टीम इंडियाचे शिलेदार

On: गुरूवार, डिसेंबर 19, 2019 12:47 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। काल(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 107 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने(Kuldeep Yadav) हॅट्रिक(hat-trick) घेत महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने गोलंदाजी करताना 33 व्या षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे शाय होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफला बाद करत वनेडतील त्याची दुसरी हॅट्रिक साजरी केली.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच वनडेत 2 किंवा त्यापेक्षा अधिक हॅट्रिक घेणारा जगातील एकूण 6 वा गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने याआधी 2017मध्ये कोलकाताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात हॅट्रिक घेतली होती.

आत्तापर्यंत भारताकडून कसोटीमध्ये हरभजन सिंग, इरफान पठाण आणि जसप्रीत बुमराह यांनी हॅट्रिक घेतली आहे. वनडेमध्ये कुलदीपबरोबरच चेतन शर्मा, कपिल देव आणि मोहम्मद शमी या भारतीय गोलंदाजांनी प्रत्येकी एकवेळा हॅट्रिक घेतली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दीपक चाहरने हॅट्रिक घेतली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज –

कसोटी –

हरभजन सिंग – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2001

इरफान पठाण – विरुद्ध पाकिस्तान, कराची, 2006

जसप्रीत बुमराह – विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन, 2019

वनडे –

चेतन शर्मा – विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर, 1987

कपिल देव – विरुद्ध श्रीलंका, कोलकाता, 1991

कुलदीप यादव – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता, 2017

मोहम्मद शमी – विरुद्ध अफगाणिस्तान, साऊथँप्टन, 2019

कुलदीप यादव – विरुद्ध वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम, 2019

आंतरराष्ट्रीय टी20 –

दिपक चाहर – विरुद्ध बांगलादेश, नागपूर, 2019

https://twitter.com/Maha_Sports/status/1207322036168617984

https://twitter.com/Maha_Sports/status/1207285123881693184

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---