बर्मिंघममध्ये येथे खेळल्या जाणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (Commonwealth Games)भारताच्या बॉक्सिंगच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. गुरूवारी झालेल्या वेगवेगळ्या वजनी गटात भारताने बॉस्किंगमधील ७ पदक जवळपास निश्चित केले आहेत. सागर अहलावत, अमित पंघाल, जॅस्मिन आणि रोहित टोकस यांनी त्यांच्या त्यांच्या वजनी गटातील सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
हरियाणाच्या २२ वर्षीय सागरने पुरूषांच्या ९२ किलो हेवीवेटच्या उपांत्यपूर्व फेरीत सेशेल्सच्या केडी इवान्स एग्नेसवर ५-० असा विजय मिळवला. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करताना त्याची चमकदारा कामगिरी सुरूच ठेवली आहे. तर उपांत्य फेरीत त्याचा सामना नायजेरियाच्या इफीनी ओनयेकवेरे याच्याशी होणार आहे.
जॅस्मिनने महिला लाईटवेटच्या ६० किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या ट्राय गार्टनचा ४-१ असा पराभव केला आहे. हा सामना चुरशीचा झाला असला तरी जॅस्मिनने पहिल्या राउंडमध्येच तिचे वर्चस्व ठेवले होते. नंतर दुसऱ्या राउंडमध्ये गार्टने पुनरागमन करत जॅस्मिनला धक्का दिला.
अमितला गोल्ड जिंकण्याचा विश्वास
२०१८च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक जिंकणारा अमित पंघाल याने ५१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश केला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनॉन मुलीगनला ५-० असे पराभूत केले आहे.
विश्व चॅम्पियन अमितने लेनॉनला सुरूवातीपासूनच आपल्या मजबूत बचावामुळे अधिक थकवले होते. दुसरीकडे रोहित टोकसने नीयूच्या झेवियर माटापाला ५-० असे पराभूत केले. तेव्हाच भारताचे सातवे पदक पक्के झाले.
MEDAL NO. 7️⃣! 🤩💪@rohit_tokas displays a good mix of aggression and defense to topple 🇳🇺’s Xavier and makes his place in the semifinals. 👊
Well done, champ! 👏👏@AjaySingh_SG | @debojo_m @birminghamcg22 #Commonwealthgames#B2022#PunchMeinHainDum 2.0#birmingham22 pic.twitter.com/VfEDUKtQE0
— Boxing Federation (@BFI_official) August 4, 2022
अमितचा उपांत्य फेरीत सामना टोकियो ऑलिम्पियन झाम्बियाच्या पॅट्रीक चिनयेबा याच्याशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाल्यानंतर अमित म्हणाला, “माझे या स्पर्धेतील आतापर्यंतचे प्रदर्शन पाहता, मला सुवर्ण पदक जिंकण्याची आशा आहे. मी माझे फुटवर्क आणखी चांगला करण्याचा प्रयत्न करत आहे. मला विश्वास आहे की मी उपांत्य फेरीचा सामना जिंकणार.”
तसेच निखत झरीन (५० किलो), नीतू गंघास (४८ किलो) आणि मोहम्मद हुसामुद्दीन (५७ किलो) यांनी आपापल्या वजनी गटातील सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
संपुर्ण यादी: कॉमन वेल्थ गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी पटकावलेल्या २० मेडल्सची यादी
आपण नुसतं पाहात बसायचं! ॲंडरसनने काढलेला ‘हा’ भन्नाट क्लीन बोल्ड बघाच
सुवर्णपदक हातून निसटणार! सतरावेळा ज्या संघाने केलंय पराभूत, त्याच संघाविरोधात भारत खेळणार सेमीफायनल