---Advertisement---

उमरान मलिकची पदार्पणाची प्रतिक्षा संपणार? कर्णधार हार्दिक पांड्याने दिले संकेत

---Advertisement---

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांची ही टी-२० मालिका सुरू होण्यापूर्वी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार हार्दिकने भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी महत्वाचे संकेत दिले. हार्दिकने अशी माहिती दिली की, आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये काही नवीन चेहरे दिसू शकतात.

आयर्लंडविरुद्धच्या या टी-२० मालिकेतील पहिला सामना २६, तर दुसरा सामना २८ जून रोजी खेळला जाणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) म्हणाला की, “आम्ही काही नवीन चेहऱ्यांना संधी देऊ इच्छितो, पण आम्ही एका चांगल्या प्लेइंग इलेव्हनची निवड करू. अशी स्थिती बनली, तर काही कॅप (पदार्पणावेळी दिली जाणारी) दिल्या जातील. पण आमचे अंतिम ध्येय हेच असेल की, एक मजबूत प्लेइंग इलेव्हनची निवड केली जावी.”

दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत रिषभ पंतने भारताचे नेतृत्व केले. पंतच्या नेतृत्वात मालिकेतील पाचही टी-२० सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही बदल केला गेला नाही. अशात उमरान मलिक (Umran Malik) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) या युवा खेळाडूंची पदार्पणासाठीची प्रतिक्षा लांबली.

अशात आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या जे बोलला, ते लक्ष्यात घेता उमरान आणि अर्शदीपला या मालिकेत पदार्पणाची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. या दोघांव्यतिरिक्त राहुल त्रिपाठी देखील भारताच्या ताफ्यात सहभागी आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएल २०२२ मध्ये स्वतःच्या प्रदर्शनाच्या जोरावर निवडकर्त्यांना प्रभावित केले आणि भारतीय संघात जागा पक्की केली.

हार्दिकला जरी या मालिकेत संघाचा कर्णधार बनवले गेले असले, तरी काही महिन्यांपूर्वी तो पुन्हा राष्ट्रीय संघात दिसेल की नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात होती. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात अपयशी ठरलेल्या हार्दिकने मधल्या काळात मोठी विश्रांती घेतली. यादरम्यान त्यान स्वतःच्या फिटनेस आणि फॉर्म पुन्हा मिळवण्यासाठी काम केले. आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने त्याला कर्णधार बनवले आणि त्याने संघाला विजतेपद देखील पटकावून दिले. आता भारताचे नेतृत्व करण्यासाठी हार्दिकच्या रूपात एक नवीन पर्याय मिळाला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या –

‘मी सांगतोय ना, उमरानला टी२० विश्वचषकात घ्या’, भारताच्या माजी कर्णधाराचे विधान

IRE vs IND | पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय धुरंधर बनवू शकतात ‘हे’ पाच महत्वाचे विक्रम

इंग्लंड दौऱ्यावर कर्णधारपदाचा दावेदार बुमराहला विराटचा चोप, व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---