महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) केपटाऊन येथे खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार 6.30 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाला या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसू शकतो. संघाची अष्टपैलू पूजा वस्त्राकर ही आजारपणामुळे सामन्यातून बाहेर पडली आहे. तिच्या जागी स्नेह राणा ताफ्यात सामील झाली आहे. याव्यतिरिक्त कर्णधार हरमनप्रीत कौर हीदेखील आजारी असून संघाबाहेर पडण्याची शक्यता आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि अष्टपैलू पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) आजारी आहेत. तसेच, ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या उपांत्या सामन्यात भारतीय संघाचा भाग नसतील. रिपोर्टनुसार, जर या सामन्यात हरमनप्रीत कौर भारतीय संघाचा भाग नसेल, तर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) तिच्या जागी नेतृत्व करेल. उपांत्य सामन्यातून बाहेर पडणे हा भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हरमनप्रीत कौर ही कर्णधारसोबतच अनुभवी खेळाडूदेखील आहे. अशात संघाला तिची कमतरता नक्कीच जाणवेल. तसेच, पूजादेखील संघासाठी मोलाची भूमिका बजावते. मात्र, आता ती बाहेर पडल्यामुळे संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
UPDATE 🚨 – Pacer Pooja Vastrakar has been ruled out due to an upper respiratory tract infection!
The Event Technical Committee of the ICC Women’s T20 World Cup 2023 has approved @SnehRana15 as a replacement for Pooja Vastrakar in the India squad! #T20WorldCup | #TeamIndia pic.twitter.com/NKiTvp22Hn
— BCCI Women (@BCCIWomen) February 23, 2023
आतापर्यंत भारतीय संघाचे प्रदर्शन
भारतीय संघाने महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. भारताने 4 साखळी सामन्यातील 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यात भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने, वेस्ट इंडिजला 6 विकेट्सने आणि आयर्लंडला 5 धावांनी पराभूत केले आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला एक पराभव पत्करावा लागला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला 11 धावांनी पराभूत व्हावे लागले होते.
ऑस्ट्रेलिया तुफान फॉर्ममध्ये
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाने स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. संघाने चारही सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, आपल्या गटात ऑस्ट्रेलिया संघ अव्वलस्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी सामन्यांमध्ये मोठा विजय मिळवला आहे. यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला 97 धावांनी, बांगलादेशला 8 विकेट्सने, श्रीलंकेला 10 विकेट्सने आणि दक्षिण आफ्रिकेला 6 विकेट्सने पराभूत केले आहे. (indian captain harmanpreet kaur and all rounder pooja vastrakar may out form semifinal ind w vs aus w read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! सेमीफायनलपूर्वीच टीम इंडियाला झटका, दोन प्रमुख खेळाडू एकाचवेळी बाहेर
ब्रेकिंग! टीम इंडियातील मराठमोळ्या क्रिकेटपटूवर कोसळला दुःखाचा डोंगर, सर्वकाही सोडून थेट घरी परतला