सध्या दक्षिण आफ्रिकेत आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळली जात आहे. भारतीय संघ सोमवारी (20 फेब्रुवारी) आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यासाठी हा सामना संस्मरणीय ठरला. ती आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 150 सामने खेळणारी पहिली भारतीय ठरली. त्याचसोबत तिने या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात टी20 मध्ये 3000 धावादेखील पूर्ण केल्या.
I. C. Y. M. I
3️⃣0️⃣0️⃣0️⃣ T20I runs for @ImHarmanpreet! 🙌 🙌
Follow the match ▶️ https://t.co/rmyQRfmmLk #TeamIndia | #T20WorldCup | #INDvIRE pic.twitter.com/cveMzpcou1
— BCCI Women (@BCCIWomen) February 20, 2023
हरमनप्रीत या सामन्यात मैदानावर उतरली तेव्हा तिने 150 व्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात पाऊल ठेवले. महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती पहिली क्रिकेटपटू ठरली. तसेच, भारतीय महिला व पुरुष संघातर्फे देखील 150 टी20 सामने तिने पूर्ण केले. मात्र, त्यासोबतच तिने आणखी एक विक्रम आपल्या नावे नोंद केला.
हरमनने या सामन्यात सातवी धाव पूर्ण करताना 3000 टी20 धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारे ती पहिली भारतीय महिला तर एकूण तिसरी फलंदाज ठरली. पुरुष क्रिकेटमध्ये विराट कोहली याच्या नावे 115 सामन्यात 4008 धावा तर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने आतापर्यंत 3853 धावा उभारल्या आहेत. महिला क्रिकेटमध्ये तिच्या आधी न्यूझीलंडची सुझी बेट्स, ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग व वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरने 3000 धावांचा टप्पा पार केला आहे.
हरमनप्रीत कौर हिच्यासाठी हा सामना फलंदाज म्हणून तितका आठवणीत राहणारा ठरला नाही. ती केवळ 13 धावा करू शकली. तिच्या आतापर्यंतच्या टी20 कारकीर्दीचा विचार केल्यास तिने 3,005 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिची सरासरी 27.83 अशी तर, स्ट्राईक रेट 105.7 इतका राहिला आहे. आंतरराष्ट्रीय महिला टी20 मध्ये शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तसेच, दुसऱ्यांदा महिला टी20 भारताचे नेतृत्व करताना दिसतेय.
(Indian Captain Harmanpreet Kaur Complete 3000 Runs In T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेकॉर्डब्रेकर हॅरी! कोणताही भारतीय पुरूष क्रिकेटपटू न करू शकलेली कामगिरी हरमनच्या नावे
केवळ ‘त्या’ दोन खेळ्यांमुळे फ्लॉप असूनही राहुलला मिळतेय संधी, रोहितच करतोय पाठराखण