---Advertisement---

रोहितने सांगितला WTC फायनल जिंकण्याचा प्लॅन! म्हणाला, “आयपीएलमध्ये खेळणारे खेळाडू…”

Rohit Sharma
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमधील मानाची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. सोमवारी (13 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याची सांगता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झाली. हा सामना दोन्ही संघांच्या सहमतीने अनिर्णित सोडवला गेला. यासह भारताने मालिका 2-1 ने नावावर केली. त्याचवेळी भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला. या सामन्यानंतर आता भारतीय कोणताही कसोटी सामना न खेळता थेट या अंतिम सामन्यात उतरेल. या ऐतिहासिक सामनेच्या दृष्टीने भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने एक महत्त्वाचे वक्तव्य केले.

भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची संधी होती. त्याचवेळी न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवल्यास भारताला थेट मिळणार होती. न्यूझीलंडने दोन गडी राखून हा सामना जिंकल्याने भारताला अंतिम फेरीचे तिकिट मिळाले.

आता भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्याची तयारी कशी करणार? असा प्रश्न सामन्यानंतरच्या पत्रकार परिषद विचारला असता कर्णधार रोहित शर्मा म्हणाला,

“आयपीएलचे साखळी सामने 21 मे पर्यंत समाप्त होतील. त्यावेळी बाहेर झालेल्या सहा संघातील खेळाडूंना आम्ही त्वरित इंग्लंडला पाठवण्याचा प्रयत्न करू. तिथे या खेळाडूंना वातावरणाशी एकरूप होण्यासाठी ड्युक चेंडूवर सराव करण्यास सांगितले जाईल. कारण या अंतिम सामन्यात ड्युक चेंडूचा वापर करण्यात येईल.”

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात सलग दुसऱ्यांदा भारतीय संघ खेळताना दिसेल. 6 जून पासून ओहल येथे रंगणाऱ्या या अंतिम सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशीश दोन हात करेल.

(Indian Captain Rohit Sharma Reveal His Plan About WTC Final And IPL)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉसचा निकाल दिल्लीच्या पारड्यात, दोन बदलांसह मैदानात उतरणार राजधानी; RCB पहिल्या विजयासाठी सज्ज
अशी कामगिरी करणारा विराट पहिलाच, विक्रम जाणून वाढेल तुमच्याही मनातील आदर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---