क्राईस्टचर्च। न्यूझीलंडने भारताविरुद्ध हेगली ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी (2 मार्च) 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर 2 सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला.
या पराभवामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली न्यूझीलंडविरुद्ध सलग 2 कसोटी सामने पराभूत होणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी डिसेंबर 2002 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध सलग 2 कसोटी सामने पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळीही 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश स्विकारावा लागला होता.
तसेच विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला कसोटी मालिकेत पहिल्यांदाच व्हाईटवॉश स्विकारण्याचीही नामुष्की ओढावली आहे.
नुकत्याच न्यूझीलंड विरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारताने पहिल्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने पराभव स्विकारला होता.
दुसऱ्या कसोटीतील विजयासह न्यूझीलंडचा टीम इंडियाला व्हाईटवॉश
वाचा👉https://t.co/CimuuDHeiU👈#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 2, 2020
दुसऱ्या कसोटीतील विजयासह न्यूझीलंडचा टीम इंडियाला व्हाईटवॉश
वाचा👉https://t.co/CimuuDHeiU👈#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 2, 2020