भारत आणि इंग्लंड यांच्यातील लीड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा एक डाव आणि ७६ धावांनी दारुण पराभव केला होता. मालिकेत सध्या दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. त्यानंतर चौथा सामना २ सप्टेंबरपासून द ओव्हल मैदानाावर सुरू झाला असून सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा पहिला डाव अवघ्या १९१ धावांमध्ये आटोपला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले. दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमीच चर्चेत असतात. याआधीही ते सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाले आहेत. दरम्यान इंग्लंविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यामधील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा फोटो चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा आहे.
फोटोत शास्त्री डोळ्यांवर चमकता नारंगी रंगाचा गाॅगल घालून झोपलेले दिसत आहेत. त्यांनी हा गाॅगल आपण झोपले असल्याचे कुणाला कळू नये यासाठी घातला असावा, असा अंदाज बाधला जात आहे. त्यांचा हा फोटो व्हायरल होत असून नेटकरी या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रियाही देत आहे.
#ravishastri #ENGvIND #LordsTest#INDvENG
Match situation tell it 😴 pic.twitter.com/tKXZfskpki
— THALAPATHY PRAVIN🔥🧊 (@Itz_PravinVJ) August 14, 2021
शास्त्री याआधीही अनेकदा स्टेडियमवर सामन्यादरम्यान डुलक्या मारताना दिसले आहेत. त्यामुळे एका नेटकऱ्याने हा फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, ‘शास्त्रींनी ते झोपले आहेत हे कळू नये म्हणून गॉगल घालण्याची जी भन्नाट आयडिया वापरलीय, त्याने मी खूप प्रभावित झालो आहे.’
Love the idea of Ravi Shastri wearing goggles to make sure there are no sleeping memes 😂#ENGvIND | #INDvENG | #INDvsENG | #ENGvsIND pic.twitter.com/JGbSrWvybW
— Sridhar_FlashCric (@SridharBhamidi) September 2, 2021
दरम्यान चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या खेळात मैदानावर वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसले. भारतीय फलंदाज शार्दुल ठाकुरने पहिल्या दिवशी संघासाठी चांगली खेळी करत ३६ चेंडूत ५७ धावा केल्या. तसेच कर्णधार विराट कोहलीनेही अर्धशतकी धावा फटकावल्या. यामुळे भारताने पहिल्या दिवशी १९१ धावा फलकावर लावल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनेही त्यांचे ३ विकेट्स गमावात ५७ धावा केल्या आहेत. चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असून यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो मालिकेत आघाडी मिळवणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे सलामीवीर फ्लॉप, पाहा एकाच षटकात कसे झाले बाद
“ती अश्विनला शोधतेय”, चौथ्या कसोटीत संधी न मिळाल्याने अश्विनच्या पत्नीचा उपहासात्मक व्हिडिओ