इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लिश गोलंदाजांनी देखील कर्णधाराच्या या निर्णयाला योग्य ठरवले. इंग्लिश गोलंदाजांनी सुरुवातीपासून भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखले. अनेक दिवसांनंतर इंग्लंड संघात पुनरागमन करत असलेल्या ख्रिस वोक्सने भारतीय फलंदाजांची पळताभुई करून सोडली. असे असले तरी शार्दुल ठाकूरने मात्र, आपल्या आक्रमक फलंदाजाची तडाखा इंग्लिश गोलंदाजांना दिला.
वोक्सने रोहित शर्माच्या रूपात इंग्लंडला पहिली विकेट मिळवून दिली होती. त्यानंतर भारताच्या विकेट्सचा सिलसिला असाच चालू राहिला. मात्र, भारताच्या शेवटच्या फळीतील शार्दुल ठाकूरने विस्फोटक फलंदाजी करत इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला.
या डावादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र, तो पुन्हा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि ५० च्या धावसंख्येवर बाद झाला. कोहली वगळता या सामन्यात कोणताही फलंदाज इंग्लिश गोलंदाजांसमोर तग धरू शकला नाही. नंतर शेवटच्या फळीतील फलंदाज शार्दुल ठाकूरने दमदार अर्धशतकी खेळी केली, त्यामुळे भारतीय संघ समाधानकारक १९१ धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.
शार्दुलच्या या आक्रमक खेळीचे आता सर्वत्र कौतुक केले जात आहे. शार्दुलने ६० व्या षटकात एखाद्या फलंदाजालाही लाजवेल अशा स्टाईलमध्ये ‘पूल शॉट’ मारत षटकारासह ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आता शार्दुलचा हा षटकार मारलेल्या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.
Shardul counter-attacks England in style and races to his 50 with a pull over square leg for 6.
Tune into Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN), Sony Ten 4 (TAM, TEL) & SonyLIV (https://t.co/AwcwLCPFGm ) now! ????#ENGvINDOnlyOnSonyTen #BackOurBoys #Shardul pic.twitter.com/pzGbUPnUI8
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 2, 2021
तसेच या अर्धशतकी खेळीसह शार्दुलने एका विक्रमाला देखील गवसणी घातली आहे. शार्दुल अवघ्या ३१ चेंडूत अर्धशतक ठोकत इंग्लंडमध्ये सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे. तसेच संपूर्ण कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्यांमध्ये तो कपिल देव यांच्या नंतर दुसरा फलंदाज देखील ठरला.
दरम्यान, भारताच्या १९१ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची देखील सुरुवात अत्यंत खराब राहिली. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. तर उमेश यादवने महत्त्वाची जो रूटची विकेट घेतली. त्यानंतर पहिल्या दिवसानंतर इंग्लंडची धावसंख्या ५३ धावांवर ३ विकेट्स अशी होती. इंग्लंडचा संघ अजूनही १३८ धावांनी पिछाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–बुमराहच्या माऱ्यापुढे इंग्लंडचे सलामीवीर फ्लॉप, पाहा एकाच षटकात कसे झाले बाद
–“ती अश्विनला शोधतेय”, चौथ्या कसोटीत संधी न मिळाल्याने अश्विनच्या पत्नीचा उपहासात्मक व्हिडिओ
–जडेजाला फलंदाजीत बढती दिल्याने तब्बल १३ वर्षांनी घडली ‘ती’ घटना, गांगुली होता शेवटचा फलंदाज