---Advertisement---

एका अटीमुळे ‘गुरुजीं’नी गमावले होते आपले प्रेम, साखरपुड्यानंतर अभिनेत्रीने मोडले होते लग्न!

On: सोमवार, मे 24, 2021 10:57 AM
---Advertisement---

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची १९च्या शतकातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटूंमध्ये गणना केली जाते. अष्टपैलू राहिलेल्या शास्त्रींनी त्यांच्या काळात मोठमोठे विक्रम केले होते. तसे तर, त्यांच्या क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशी आपण सर्वच परिचित आहोत. परंतु त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा खूप गाजला होता, जो खूप कमी लोकांना माहीत असेल.

भारतीय संघाच्या महागुरुंचे प्रेम प्रकरण एकेकाळी खूप गाजले होते. असे म्हणतात की, रवी शास्त्री यांचे बॉलिवुड अभिनेत्री अमृता सिंग सोबत प्रेम प्रकरण होते. महागुरूंचे अमृता सिंगवर खूप प्रेम होते. परंतु काही कारणास्तव त्यांचा विवाह होऊ शकला नव्हता.

सोशल मीडियाच्या काळात काही सेकंदातच गोष्टी व्हायरल होतात. परंतु सोशल मीडियाचा अधिक वापर नसणाऱ्या काळात रवी शास्त्री आणि अमृता सिंग हे मॅगझिनच्या मुख पृष्ठावर झळकले होते. त्यांनतर या दोघांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चांना उधाण आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रवी शास्त्री यांनी अमृता सिंगसोबत साखरपुडा केला होता. तसेच हे दोघे विवाहबंधनात देखील अडकले होते. परंतु रवी शास्त्री यांनी एक अट ठेवली होती, जी अमृता सिंगला मान्य नव्हती. त्यांची अट अशी होती की, विवाह झाल्यानंतर अभिनय सोडून तिने घर सांभाळावे. परंतु तिने असे करण्यास नकार दिला होता.

ती त्यावेळी नुकतीच बॉलिवुडमध्ये रुजू झाली होती. परंतु रवी शास्त्री यांना वाटत होते की, त्यांच्या होणाऱ्या पत्नीने, इतर व्यवसाय न करता त्यांचे घर सांभाळावे. हे अमृताला मान्य नव्हते. त्यानंतर १९९० मध्ये रवी शास्त्री यांनी रितु सिंगशी लग्नगाठ बांधली. तर १९९१ मध्ये अमृता सिंगने सैफ अली खानसोबत विवाह केला होता.

रवी शास्त्री सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची भूमिका पार पाडत आहेत. त्यांच्या देखरेखीखाली भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारतीय संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तर त्यांनतर इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दमदार प्रदर्शनाने कारकिर्दीचं शिखर गाठणारे दिग्गज क्रिडापटू, पुढे मोठ्या चुकीमुळे बनले ‘खलनायक’

कोटींमध्ये पगार मिळणारे क्रिकेटविश्वातील टॉप-१० कर्णधार, कोहली नव्हे ‘या’ संघनायकाला मिळते सर्वाधिक वेतन

टेस्ट चॅम्पियनशीप: ‘या’ धाकड अष्टपैलूच्या अनुपस्थित शार्दुलला मिळावी संधी, प्रशिक्षकाने मांडले मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---