---Advertisement---

कोटींमध्ये पगार मिळणारे क्रिकेटविश्वातील टॉप-१० कर्णधार, कोहली नव्हे ‘या’ संघनायकाला मिळते सर्वाधिक वेतन

On: सोमवार, मे 24, 2021 10:01 AM
---Advertisement---

क्रिकेट या खेळाद्वारे क्रिकेटपटू चिक्कार पैसा कमावतात. त्यातही कोणत्याही संघाच्या कर्णधाराचा पगार हा संघातील इतर खेळाडूंच्या मानाने थोडाफार जास्तच असतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयला क्रिकेटविश्वातील सर्वाधिक श्रीमंत बोर्डामध्ये गणले जाते. अशातच या संघाच्या कर्णधाराचा पगारही इतर संघांच्या कर्णधारांपेक्षा जास्त असणे साहजिक आहे. परंतु वास्तवात असे नाही.

होय, हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही; परंतु भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यापेक्षाही अधिक वेतन दुसऱ्या एका संघाच्या कर्णधाराला मिळते. हा संघनायक अजून कोण नसून, इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रुट आहे. क्रिकेटविश्वातील वेगवेगळ्या राष्ट्रीय संघांच्या कर्णधारांना मिळणाऱ्या वार्षिक मानधनामध्ये रुटचा अव्वल क्रमांक लागतो. त्याला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून एका वर्षाचे ८.९७ कोटी मानधन मिळते. त्याच्यानंतर ७ कोटींसह विराटचा दुसरा क्रमांक लागतो.

ऑस्ट्रेलियाच्या वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार आरोन फिंच आणि कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन हे दोघेही वर्षाला ४.८ कोटी कमावतात. तर दक्षिण आफ्रिकाच्या कसोटी संघाचा कर्णधार डीन एल्गार ३.२ कोटी आणि मर्यादित षटकांचा संघनायक तेम्बा बावुमाला २.५ कोटी मिळतात. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन वर्षाचे १.७७ कोटी कमावतो. याव्यतिरिक्त त्याला वर्षाचे ३० लाख बोनसच्या रुपात मिळतात.

याबरोबरच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गन (१.७५ कोटी), वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या कर्णधार कायरन पोलार्ड (१.७३ कोटी) आणि वेस्ट इंडिज कसोटी संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट (१.३९ कोटी) यांनाही वर्षाचे १ कोटींपेक्षा जास्त मानधन मिळते.

तर कोटींपेक्षा कमी वार्षिक पगार मिळणाऱ्या कर्णधारांमध्ये बाबर आझम, दिमुथ करुणारत्ने, कुसल परेरा यांचा समावेश होतो. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला वर्षाचे ६२.४ लाख मिळतात. श्रीलंका कसोटी संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला ५१ लाख आणि वनडे संघाचा कर्णधार कुसल परेराला २५ लाख मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या-

टेस्ट चॅम्पियनशीप: ‘या’ धाकड अष्टपैलूच्या अनुपस्थित शार्दुलला मिळावी संधी, प्रशिक्षकाने मांडले मत

वडिलांच्या एका चुकीमुळे पृथ्वी शॉला झाला होता ८ महिन्यांचा वनवास, स्वत:च दिली माहिती

त्याने एका हंगामात ६७ विकेट्स घेतल्यात, त्याला अजून एक संधी मिळालाच हवी; पुजाराचा ‘त्या’ गोलंदाजांला पाठिंबा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---