---Advertisement---

त्याने एका हंगामात ६७ विकेट्स घेतल्यात, त्याला अजून एक संधी मिळालाच हवी; पुजाराचा ‘त्या’ गोलंदाजांला पाठिंबा

On: सोमवार, मे 24, 2021 7:52 AM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी कित्येक क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धा किंवा आयपीएलमध्ये कठोर मेहनत घेताना दिसून येतात. अनेकांना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळही मिळते. परंतु भारतीय संघात जागा मिळवण्यापेक्षा, संघातील आपले स्थान टिकवून ठेवणे त्यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक ठरल्याची बरीच उदाहरणे आपण पाहिली आहेत. यातीलच एक नाव म्हणजे, २९ वर्षीय भारतीय गोलंदाज जयदेव उनाडकट याचे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करुनही त्याला मागील ११ वर्षांपासून पुनरागमनाची संधी मिळालेली नाही. आता भारतीय कसोटीपटू चेतेश्वर पुजारा त्याच्या पाठीशी उभा राहिला आहे.

उनाडकटने २०१९-२० रणजी ट्रॉफी हंगामात शानदार गोलंदाजी प्रदर्शन केले होते. त्याने या पूर्ण हंगामात तब्बल ६७ विकेट्स चटकावल्या होत्या. या रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका हंगामात कोणत्या वेगवान गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक विकेट्स ठरल्या होत्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्र संघाने रणजी ट्रॉफी जिंकली होती. यानंतर त्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात जागा देण्याची मागणी करत आहेत.

या साखळीत आता पुजाराचे नाव जोडले गेले आहे. रणजी ट्रॉफीतील लक्षणीय प्रदर्शनानंतर उनाडकटला भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची संधी देण्यात यावी, असे त्याने म्हटले आहे. तो म्हणाला की, “उनाडकटने पूर्ण हंगामात (रणजी ट्रॉफी हंगाम) खूप चांगली गोलंदाजी केली आहे. त्याने एका हंगामात ६७ विकेट्स घेतल्या आहेत. मला नाही वाटत इतर कोणी एका रणजी ट्रॉफी हंगामात यापेक्षा चांगली कामगिरी करु शकतो. भारतीय संघात जागा देण्यासाठी खेळाडूच्या रणजी ट्रॉफीतील प्रदर्शनाला महत्त्व दिले गेले पाहिजे. जर त्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली नाही; तर मला आश्चर्य वाटेल.”

उनाडकटने त्याचा शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१६ मध्ये खेळला होता. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्याने कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचा हा कसोटी पदार्पणाचा सामनाच त्याचा शेवटचा कसोटी सामना ठरला. त्यानंतर आतापर्यंत त्याला एकदाही भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु तो सातत्याने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. आतापर्यंत ८९ प्रथम श्रेणी सामने खेळताना त्याने ३२७ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान ४१ धावांवर ७ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टेस्ट चॅम्पियनशीप: न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज म्हणतोय, आयपीएलची स्थगिती भारतीय संघाच्या पथ्यावरच; होईल ‘हा’ फायदा

टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तयारी जोरात! काऊंटी सामने पाहून न्यूझीलंडचा संघ घेतोय खेळपट्टीचा अंदाज?

आयपीएल स्पर्धेत फ्लॉप ठरलेला ‘हा’ फलंदाज सीपीएलमध्ये पार पडणार कर्णधारपदाची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---