येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात,भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. अशातच न्यूझिलंड संघाचा फलंदाज रॉस टेलरने विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी भारतीय फलंदाजांबद्दल भाष्य केले आहे.
न्यूझीलंड संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी, इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी न्यूझिलंड संघाचा आक्रमक फलंदाज, रॉस टेलरने भारतीय संघाबद्दल भाष्य करत म्हटले आहे की, “मला वाटते की, आयपीएल स्पर्धा लवकर स्थगित होणे, भारतीय संघासाठी फायदेशीर ठरू शकते. जर आयपीएल स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार झाली असती तर, भारतीय संघाला सराव करण्यासाठी कमी वेळ मिळाला असता. परंतु आता त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. त्यांचा गोलंदाजांना ही सराव करण्याची संधी आहे. ”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जर मी असे म्हणालो की, मी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा विचार करत नाहीये तर मी खोटं बोलत असेल. इंग्लंड विरुद्ध २ कसोटी सामन्याची मालिका खेळणे, याशिवाय तयारीसाठी आणखी काही चांगले असूच शकत नाही.अखेर अंतिम सामना तटस्थ ठिकाणी खेळला जाणे आवश्यक आहे. इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्याचा आम्हाला फायदा होईल. परंतु, हा भारतीय संघ बर्याच काळापासून प्रथम क्रमांकावर आहे आणि येथे त्यांना बरेच यश मिळाले आहे. ”
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ – केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट व रोहितला बाद करू शकतोस का?’ जिमी निशामने दिले ‘हे’ उत्तर
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तयारी जोरात! काऊंटी सामने पाहून न्यूझीलंडचा संघ घेतोय खेळपट्टीचा अंदाज?
तमिम इक्बाल खऱ्या अर्थाने बनला दिग्गज! महान सलामीवीरांच्या पंक्तीत झाला सामील






