येत्या काही दिवसात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा १८ ते २२ जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.न्यूझीलंड संघाला या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाला एकप्रकारे सराव करण्याची संधी मिळणार आहे. तरीदेखील क्रिकेट चाहत्यांना एक अटीतटीचा सामना पहायला मिळेल, यात काही शंका नाही.
या मोठ्या सामन्यांपूर्वी, खेळपट्टीचा अनुमान घेण्यासाठी न्यूझीलंड संघातील खेळाडू काउंटी सामने पाहताना दिसून आले आहेत. येत्या २ जून पासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेपूर्वी, न्यूझीलंड संघातील खेळाडू कसून सराव करत आहेत. तसेच सराव झाल्यानंतर मिळालेल्या रिकाम्या वेळात हे खेळाडू साउथॅम्प्टनच्या खेळपट्टीचा अनुमान घेण्यासाठी काउंटी क्रिकेट सामन्याचा आनंद घेत होते.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये न्यूझीलंड संघातील खेळाडू सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच त्यांनी या फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की,”या खेळाडूंना क्रिकेट आवडते. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी हॅम्पशायर आणि लीसेस्टरशायर यांच्यातील अंतिम दिवसाच्या सामन्याचा आनंद लुटला.”
हॅम्पशायर आणि लीसेस्टरशायर यांच्यातील सामना साउथॅम्प्टनला झाला. हा सामना अनिर्णित राहिला.
These guys love cricket. Players and support staff taking in final day action between @hantscricket and @leicsccc ???? pic.twitter.com/6xgpnAJM5p
— BLACKCAPS (@BLACKCAPS) May 22, 2021
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), ऋधिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ – केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या –
तमिम इक्बाल खऱ्या अर्थाने बनला दिग्गज! महान सलामीवीरांच्या पंक्तीत झाला सामील
आयपीएल स्पर्धेत फ्लॉप ठरलेला ‘हा’ फलंदाज; सीपीएलमध्ये पार पडणार कर्णधारपदाची जबाबदारी




टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा