न्यूझीलंडचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू जिमी निशाम हा मैदानावरील आणि मैदानाबाहेरील एक मजेदार व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो. हा तीस वर्षीय अष्टपैलू सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या हजरजबाबीपणामुळे तो चाहत्यांना फार आवडतो. त्याचा हजरजबाबीपणा नुकताच क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. विराट कोहली व रोहित शर्मा यांचेबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्याने मजेदार उत्तर दिले.
न्यूझीलंडच्या संघाचा आहे भाग
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २२ जून दरम्यान एजबॅस्टन येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडच्या २० सदस्यीय संघात त्याचा समावेश केला गेला असून, या संघाचे नेतृत्व केन विलियम्सन करेल. तत्पूर्वी, न्यूझीलंडला इंग्लंडविरुद्ध २ जूनपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
चाहत्याच्या प्रश्नाला दिले असे उत्तर
निशामच्या एका चाहत्याने ट्विटरवर त्याला प्रश्न विचारला की, ‘तुला वाटते का तू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात बाद करू शकतो?’
या प्रश्नावर जराही वेळ न दवडता निशामने रिप्लाय देताना लिहले, ‘मी म्हणू शकतो की हे काहीसे असंभव आहे.’ त्याचे हे ट्विट आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागले आहे.
I would say that’s very unlikely https://t.co/S2YO22loW5
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) May 20, 2021
अशी राहिली आहे कसोटी कारकीर्द
भारताविरुद्ध २०१४ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या निशामने आत्तापर्यंत केवळ १२ कसोटीमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. या १२ सामन्यात त्याने ३३.८ च्या सरासरीने ७०९ धावा व १४ बळी मिळवले आहेत. निशामने आपला अखेरचा कसोटी सामना चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१७ मध्ये खेळला होता. नुकत्याच स्थगित झालेल्या आयपीएल २०२१ मध्ये तो मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करताना दिसलेला. तो स्पर्धेत केवळ एक सामना खेळू शकला.
महत्त्वाच्या बातम्या –
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलची तयारी जोरात! काऊंटी सामने पाहून न्यूझीलंडचा संघ घेतोय खेळपट्टीचा अंदाज?
तमिम इक्बाल खऱ्या अर्थाने बनला दिग्गज! महान सलामीवीरांच्या पंक्तीत झाला सामील
आयपीएल स्पर्धेत फ्लॉप ठरलेला ‘हा’ फलंदाज; सीपीएलमध्ये पार पडणार कर्णधारपदाची जबाबदारी






