---Advertisement---

‘…म्हणूनच मुंबई इंडियन्सचे खेळाडू इतके प्रगतीशील आहेत,’ भारतीय दिग्गजाने केली रोहितची स्तुती

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 11:04 AM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा १० धावांनी पराभव केला. चेन्नईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ १५२ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात कोलकाता संघाला ७ विकेट्स गमावत १४२ धावाच करता आल्या. कोलकाताच्या या लाजिरवाण्या पराभवाचे मुख्य कारण ठरला, मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू ‘राहुल चाहर’.

विजय संपादन केल्यानंतर चाहरने आपल्या कामगिरीचे श्रेय कर्णधार रोहित शर्मा याला दिले आहे. त्याचे वक्तव्य भारतीय समालोचक हर्षा भोगले यांच्या मनाला भावले.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करताना त्यांनी लिहिले, ‘एखाद्या संघाचा गोलंदाज (राहुल चाहर) खुद्द म्हणतो की, कधीकधी माझ्या संघनायकाचा (रोहित शर्मा) माझ्यावर इतका विश्वास असतो, जितका मला स्वत:लाही माझ्यावर नाही. यावरुन तुम्हाला कळेल की, त्या संघातील खेळाडूंमध्ये आपोआप कशी प्रगती होत जाते.’

थोडक्यात सांगायचे झाले तर, हर्षा भोगले यांनी चाहरचे उदाहरण घेत मुंबई संघातील खेळाडूंच्या प्रगतीमागील कारण सांगितले आहे. मुंबईचा कर्णधार रोहितला त्याच्या संघातील प्रत्येक खेळाडूतील प्रतिभेवर विश्वास आहे. भलेही त्या खेळाडूने एखाद्या सामन्यात अतिशय वाईट कामगिरी केली असेल. तरीही रोहित त्याला पूर्ण विश्वासासह पुन्हा संधी देतो, हेच त्यांना सांगायचे आहे.

मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात २१ वर्षीय चाहरने अविश्वसनीय आणि अभुतपुर्व कामगिरी केली. संघाला ज्यावेळी विकेट्सची नितांत गरज होती, त्यावेळी त्याने महत्त्वाच्या फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. नितिश राणा (५७ धावा) शुबमन गिल (३३ धावा) यांच्या विकेट्स अतिशय महत्त्वपुर्ण ठरल्या. त्यानंतर राहुल त्रिपाठी, कोलकाताचा कर्णधार ऑएन मॉर्गन या धाकड फलंदाजांचीही त्याने शिकार केली. यामुळेच गमावता सामना मुंबईच्या हाती आला आणि त्यांनी हंगामातील पहिला विजय नोंदवला.

महत्त्वाच्या बातम्या-

अतिशय निराशादायी, माफी असावी; केकेआरच्या दारुण पराभवानंतर संघ मालकाने व्यक्त केली दिलगिरी

गमावता सामना जिंकण आम्हाला जमतं! मुंबई इंडियन्सने कसा केला सामन्याचा कायापालट? ऐका रोहितच्या तोंडून

अरेरे! पहिला चेंडू टाकण्याआधीच रोहितचा पाय मुरगळला अन् वेदनेने मैदानावर व्हिवळत बसला, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---